निकृष्ट दर्जाचे लादीकरण

By admin | Published: October 7, 2016 05:58 AM2016-10-07T05:58:37+5:302016-10-07T05:58:37+5:30

विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर २ मधील स्वयंभू हनुमान नगर चाळ क्रमांक दोन येथील २० ते २५ मीटर चाळीच्या आवारात लाद्या बसविण्याचे काम सुरू

Degrading quality | निकृष्ट दर्जाचे लादीकरण

निकृष्ट दर्जाचे लादीकरण

Next

मुंबई : विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर २ मधील स्वयंभू हनुमान नगर चाळ क्रमांक दोन येथील २० ते २५ मीटर चाळीच्या आवारात लाद्या बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र लाद्या समांतर बसवण्यात आल्या नसल्याने खड्डे तयार होण्यासह पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. केवळ रेतीवर लाद्या बसवण्यात आल्या असून, हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. याबाबत कंत्राटदाराला विचारणा केली असता त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळत नाही. यासंबंधी लोकप्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर चांगल्या कामाचे आश्वासन मिळाले आहे. मात्र उर्वरित कामही निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले.
येथे काम करणाऱ्या कामगारांनी आपले साहित्यही येथेच ठेवले असून, यात पावसाचे पाणी साचत आहे. साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होण्याची भीती असून, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे येथील रहिवासी सुनीता शिंदे, पल्लवी बदक यांनी सांगितले. तर चंद्रकांत नागोळकर यांनी सांगितले की, २५ वर्षांपूर्वी या परिसरात लाद्या बसवण्यात आल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी येथील लाद्यांचे काम करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. त्यानंतर आता सप्टेंबर २०१६ मध्ये लादीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. कंत्राटदार सलग काम करत नाहीत. शिवाय फक्त रेती भरून त्यावर तात्पुरत्या लाद्या बसविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या लाद्या किती दिवस तग धरतील हा प्रश्नच आहे. यासंदर्भात येथील नगरसेविका प्रियांका शृंगारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, स्वयंभू हनुमान नगर येथे लादीकरणाचे काम सुरू आहे.
हे काम चांगले होणे गरजेचे आहे. जर लादीकरणाचे काम कंत्राटदार व्यवस्थित करत नसतील तर त्यांची तक्रार महापालिकेकडे करावी. तसे निवेदन दिल्यानंतर समस्येकडे लक्ष दिले जाईल. (प्रतिनिधी)
कंत्राटदाराकडून योग्य उत्तर नाही
च् कंत्राटदार सलग काम करत नाहीत. रेती भरून त्यावर तात्पुरत्या लाद्या बसविण्याचे काम करत आहेत. यासंदर्भात येथील नगरसेविका प्रियांका शृंगार यांनी सांगितले की, स्वयंभू हनुमान नगर येथे लादीकरणाचे काम सुरू आहे. रेतीवर लाद्या बसवण्यात आल्या असून, काम निकृष्ट दर्जाचे आहे.
च् याबाबत कंत्राटदाराला विचारणा केली असता त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळत नाही. यासंबंधी लोकप्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर चांगल्या कामाचे आश्वासन मिळाले आहे.

Web Title: Degrading quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.