मुंबई : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित केले जातात. पण स्वातंत्र्य दिन उलटूनही अद्यापही पुरस्कार जाहीर केलेले नाहीत. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना हे पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाला जाहीर करण्यात येत होते. त्यात आता शिक्षण विभागाने बदल केला असून, १९ जानेवारी २०१५च्या परिपत्रकानुसार राज्य शिक्षक पुरस्कार १५ आॅगस्ट रोजी जाहीर केले जातील व ५ सप्टेंबर शिक्षक दिनाला पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे म्हटले आहे. स्वातंत्र्य दिन होऊन चार दिवस झाले तरी अद्यापही शासनाने पुरस्कार जाहीर केले नसून ते तातडीने जाहीर करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष यांनी शालेय शिक्षण सचिव यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)
आदर्श शिक्षक पुरस्कारांना विलंब
By admin | Published: August 19, 2015 1:24 AM