पेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांना विलंब
By admin | Published: January 4, 2016 02:41 AM2016-01-04T02:41:17+5:302016-01-04T02:41:17+5:30
विद्यापीठाच्या परीक्षेवेळेस गोंधळाची प्रचिती रविवारी झालेल्या पेट परीक्षेच्या वेळी पुन्हा एकदा आली आहे.
मुंबई : विद्यापीठाच्या परीक्षेवेळेस गोंधळाची प्रचिती रविवारी झालेल्या पेट परीक्षेच्या वेळी पुन्हा एकदा
आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी वेळेवर हजर राहूनही प्रश्नपत्रिका
मात्र, परीक्षेच्या वेळेच्या तब्बल
४० मिनिटे उशिराने विद्यार्थ्यांच्या हाती पडल्या. त्यामुळे परीक्षार्थी निराश झाले.
पीएचडीसाठी घेण्यात येणारी ‘पेट’ ही परीक्षा भायखळा येथील साबु सिद्दीक कॉलेज आॅफ इंजिनीयरिंग येथे रविवारी घेण्यात आली. दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका २.४० वाजता विद्यार्थ्यांच्या हातात आल्या. यात मराठी, झूलॉजी, लायब्ररी सायन्स अशा काही विषयांचा समावेश होता. विशेष म्हणजे, गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षकाला प्रश्नपत्रिकेबद्दल विचारल्यावर विद्यापीठातून प्रश्नपत्रिका आल्या नाहीत. त्या आल्यावर त्याच्या प्रती काढून मग विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे सांगण्यात आले आणि परीक्षेला उशीर झाल्यामुळे, नंतर वाढीव वेळ देण्यात आला.