वादग्रस्त कंपनीलाच ‘बेस्ट’मध्ये पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:05 AM2018-03-15T02:05:58+5:302018-03-15T02:05:58+5:30

ई-तिकीट देणाऱ्या मशिनमधील बिघाडामुळे बस वाहक व प्रवाशांची गैरसोय होत आहे, तरीही ही मशिन पुरविणा-या ट्रायमॅक्स कंपनीला पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय बेस्ट समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Delayed company reinforces extension in 'Best' | वादग्रस्त कंपनीलाच ‘बेस्ट’मध्ये पुन्हा मुदतवाढ

वादग्रस्त कंपनीलाच ‘बेस्ट’मध्ये पुन्हा मुदतवाढ

Next

मुंबई : ई-तिकीट देणाऱ्या मशिनमधील बिघाडामुळे बस वाहक व प्रवाशांची गैरसोय होत आहे, तरीही ही मशिन पुरविणा-या ट्रायमॅक्स कंपनीला पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय बेस्ट समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बेस्ट समितीच्या पाच सदस्यीय उपसमितीच्या शिफारशीनुसार या कंपनीला जीवदान देण्यात आले आहे.
ट्रायमॅक्स कंपनीने पुरविलेल्या मशिनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याच्या तक्रारी आहेत. नादुरुस्त मशिनमुळे बेस्टलाही दररोज आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे या कंपनीला पुन्हा मुदतवाढ न देता, नव्याने निविदा काढून दुसºया कंपनीला कंत्राट देण्याचा बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांचा प्रयत्न होता. मात्र, बेस्ट समितीने नेमलेल्या उपसमितीने ट्रायमॅक्स कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी सूचना केली.
नव्या कंपनीची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रियेला सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ट्रायमॅक्स कंपनीला मुदतवाढ द्यावी, अशी सूचना उपसमितीने केली. ही सूचना बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. सहा महिन्यांत ट्रायमॅक्स कंपनीने चांगली सेवा अथवा अद्ययावत यंत्रणा न उभारल्यास, या कंपनीचे कंत्राट रद्द करून नव्या कंपनीला काम द्यावे, अशी शिफारसही या उपसमितीने अहवालात केली आहे.
>फुकट्या प्रवाशांचे फावते
ट्रायमॅक्स कंपनीच्या तिकीट वितरण करणाºया मशिन सदोष असल्यामुळे फुकट्या प्रवाशांचे फावते आहे. परिणामी, बेस्टचे दररोज ५० लाख रुपयांचे नुकसान होत असल्याची बाब सदस्यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिली.

Web Title: Delayed company reinforces extension in 'Best'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.