‘डम्पिंग हटवा; कुर्ला वाचवा’साठी रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 02:43 AM2018-10-21T02:43:30+5:302018-10-21T02:43:37+5:30

एलबीएस मार्गावरील कुर्ला गार्डनच्या जवळील डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिक रहिवाशांना आजारांना सामोरे जावे लागत आहे.

'Delete dumping; Stop the way to save the Kurla | ‘डम्पिंग हटवा; कुर्ला वाचवा’साठी रास्ता रोको

‘डम्पिंग हटवा; कुर्ला वाचवा’साठी रास्ता रोको

Next

मुंबई : एलबीएस मार्गावरील कुर्ला गार्डनच्या जवळील डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिक रहिवाशांना आजारांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येचे निवारण होण्यासाठी स्थानिकांनी एल विभागाच्या सहायक आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहायक आयुक्तांची भेट होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी एल विभागाच्या समोरील रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. काही वेळानंतर पालिका अधिकाऱ्यांनी स्थानिकांची भेट घेत, डम्पिंगच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, रास्ता रोको केल्याने वाहतूककोंडी झाली होती. परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.
कुर्ल्यातील इंदिरानगर, साईनगर येथून मोर्चा सुरू करण्यात आला. त्यानंतर, एल विभागाच्या मुख्य गेटवर स्थानिक रहिवासी बसले होते. ‘डम्पिंग हटवा, आरोग्य वाचवा’, ‘कुर्ल्यातील जनतेला न्याय द्या’, ‘कुर्ला डम्पिंग मुक्त पाहिजे’, ‘सध्याच्या सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा स्थानिक रहिवाशांकडून देण्यात आल्या. माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. एल विभागाचे सहायक आयुक्त भेट देत नसल्याने, स्थानिक रहिवासी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी रास्ता रोको केला. कुर्ल्यातील डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिकांना अनेक वर्षांपासून त्रास होत आहे. स्थानिक रहिवाशांचा अनेक वर्षांपासून डम्पिंग ग्राउंडच्या विषयावर लढा सुरू आहे. मात्र, तरीदेखील प्रशासनाकडून कुर्ला डम्पिंगच्या विषयावर निर्णय घेतला जात नाही, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
>डम्पिंग ग्राउंडमुळे निर्माण झाला आरोग्याचा प्रश्न
कुर्ला डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. हवेमार्फत सर्वदूर कचºयाची दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. रहिवाशांना दमा, खोकला यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. मलेरिया आणि डेंग्यू यासारखे आजार पसरले जात आहेत.

Web Title: 'Delete dumping; Stop the way to save the Kurla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.