Join us

फेरीवाल्यांना पंधरा दिवसांत हटवा अन्यथा सोळाव्या दिवशी मनसेचे ‘खळ्ळ खट्याक’ - राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 6:30 AM

रेल्वेने फेरीवाले हटवले नाहीत तर सोळाव्या दिवशी मनसैनिक आपल्या पद्धतीने फेरीवाल्यांना हटवतील. तेव्हा जो संघर्ष होईल त्याला सर्वस्वी रेल्वे जबाबदार असेल

मुंबई : पंधरा दिवसांत मुंबईतील सर्व रेल्वे स्थानके, पादचारी पूल व गर्दीच्या वेळी बाहेर पडण्याच्या जागा या सगळ्या ठिकाणांहून फेरीवाले हटवा. रेल्वेने फेरीवाले हटवले नाहीत तर सोळाव्या दिवशी मनसैनिक आपल्या पद्धतीने फेरीवाल्यांना हटवतील. तेव्हा जो संघर्ष होईल त्याला सर्वस्वी रेल्वे जबाबदार असेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी दिला.२९ सप्टेंबरला एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीचा निषेध करण्यासाठी गुरुवारी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने मेट्रो सिनेमा ते चर्चगेट स्टेशनदरम्यान संताप मोर्चा काढला. चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात रेल्वे अधिकाºयांची भेट घेतल्यानंतर राज यांनी मोर्चेकºयांना संबोधित केले. या वेळी राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे प्रशासनावर सडकून टीका केली. आजचा मोर्चा आम्ही शांततेत काढला, पण यापुढेही परिस्थिती हीच राहिली तर आम्ही शांत राहणार नाही, असे सांगत राज म्हणाले की, कधी खड्ड्यात, कधी पुलावर, रेल्वेखाली किड्यामुंग्यांसारखी माणसे मरताहेत व हे उच्चस्तरीय बैठका घेताहेत. इतक्या वर्षांनंतरही प्रश्न कसे सुटत नाहीत, असा सवाल राज यांनी केला.बुलेट ट्रेनवरून राज यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. बुलेट ट्रेनमागे मुंबई बळकावण्याचा गुजरातचा डाव आहे. मूठभर गुजरात्यांसाठी सरकार एक लाख कोटींचे कर्ज काढणार आणि नंतर सगळा देश हे कर्ज फेडणार, असे सांगत मुंबईकरांना बुलेट ट्रेनची आवश्यकता नसल्याचे राज म्हणाले. बुलेट ट्रेनला विरोध केल्यामुळेच सुरेश प्रभू यांना मंत्रिपदावरून काढून टाकल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखलपोलीस परवानगी नसतानाही गुरुवारी मनसेने मोर्चा काढल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मोर्चा काढून रहदारीस अडथळा निर्माण करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल हा गुन्हा दाखल केला.पंतप्रधान मोदींना केले लक्ष्यया मेळाव्यातही राज यांनी मोदींना लक्ष्य केले. देशातील महत्त्वाचे प्रश्न सुटलेले नाहीत. या प्रश्नातून मार्ग काढायचे सोडून नोटाबंदीसारखा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने घात केल्यास जास्त राग येतो. मोदींनी गुजरातच्या विकासाचे खोटे चित्र उभे केले होते. आता त्या विकासाचे खरे रूप बाहेर येत आहे. जनतेने मोदींवर विश्वास ठेवत भाजपाला मते दिली. मात्र मोदींनी जनतेचा विश्वासघात केला. भाजपाच्या इतर नेत्यांनाही हे जाणवत आहे. त्यामुळे ‘विकास वेडा झाला आहे’ अशा घोषणा आता भाजपावालेच पसरवत आहेत.पालिका कर्मचाºयांच्या मोर्चाला थंड प्रतिसाद : मुंबई महापालिकेतील कर्मचारी, अधिकाºयांना दिवाळीनिमित्त ४० हजार रुपये बोनस मिळावा व विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात मोर्चा आयोजित केला होता. त्याला थंड प्रतिसाद मिळाला. बोनसबाबत ९ आॅक्टोबरपर्यंत निर्णय जाहीर न केल्यास १० आॅक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा समन्वय समितीने दिला आहे.दबावाखाली येऊ नकासर्वोच्च न्यायालय आणिउच्च न्यायालयाचे न्यायाधीशआणि अधिकाºयांनी सरकारच्या दबावाखाली निर्णय देऊ नयेत. सरकार आज आहे, उद्या नाही. पत्रकार मंडळींनीही सरकारविरोधात आवाज बुलंद करावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

टॅग्स :राज ठाकरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाएलफिन्स्टन चेंगराचेंगरीआता बास