Join us

प्रदूषणात पहिल्या स्थानावर दिल्लीच : मुंबईऐवजी अहमदाबाद दुसऱ्या स्थानी  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 6:54 AM

मुंबईच्या उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुल आणि अंधेरी हे परिसर सर्वाधिक प्रदूषित म्हणून ‘सफर’ या संकेतस्थळावर बुधवारी नोंदविले गेले आहेत.

मुंबई : मुंबईच्या उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुल आणि अंधेरी हे परिसर सर्वाधिक प्रदूषित म्हणून ‘सफर’ या संकेतस्थळावर बुधवारी नोंदविले गेले आहेत. मंगळवारी सर्वाधिक प्रदूषणात पहिल्या स्थानी दिल्ली, तर दुसºया स्थानी मुंबई होती. बुधवारी हे चित्र काहीसे बदलले. दुसºया स्थानावर मुंबईऐवजी अहमदाबादची नोंद झाली असून, दिल्लीचे पहिले स्थान मात्र कायम आहे. मुंबई तिसºया स्थानावर आहे.मुंबई उपनगरचा विचार केल्यास उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुल आणि अंधेरी हे परिसर सर्वाधिक प्रदूषित म्हणून जाहीर झाले असून, या दोन्ही परिसरांतील धूलिकणांचे प्रमाण अनुक्रमे ३२१, ३३३ पर्टिक्युलेट मॅटर एवढे नोंदविण्यात आले आहे. त्या खालोखाल बोरीवली, मालाड आणि नवी मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण काहीसे कमी नोंदविण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात येथील हवा खराबच असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे.देशातील शहरांतील प्रदूषणाचा विचार करता, मंगळवारप्रमाणेच बुधवारीही दिल्ली पहिल्या स्थानावर कायम आहे. येथील प्रदूषणाचे प्रमाण ३६४ पर्टिक्युलेट मॅटर एवढे नोंदविण्यात आले आहे. बुधवारी दुसºया स्थानी अहमदाबाद असून, येथील धूलिकणांचे प्रमाण १९९ पर्टिक्युलेट मॅटर आहे. तिसºया स्थानी मुंबई असून, येथील धूलिकणांचे प्रमाण १८७ पर्टिक्युलेट मॅटर एवढे नोंदविण्यात आले आहे. तत्पूर्वी मंगळवारी प्रदूषणात पहिल्या स्थानी दिल्ली आणि दुसºया स्थानी मुंबई होती.मुंबईची हवा काहीशी बरी‘सफर’च्या नोंदीनुसार मंगळवारी दिल्लीतील धूलिकणांचे प्रमाण ३८५, मुंबईतील २३९ तर अहमदनगर येथील धूलिकणांचे प्रमाण १४६ पर्टिक्युलेट मॅटर एवढे नोंदविण्यात आले होते. बुधवारी मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण मंगळवारच्या २३९ वरून १८७ पर्टिक्युलेट मॅटर एवढे झाले. याउलट अहमदाबादचे १४६ वरून १९९ एवढे वाढल्याने अहमदाबाद प्रदूषणात दुसºया स्थानी आले. त्यामुळे मंगळवारच्या तुलनेत बुधवारी मुंबईची हवा काहीशी बरी असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :प्रदूषणमुंबई