दिल्लीला १२० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 04:04 AM2021-05-02T04:04:51+5:302021-05-02T04:04:51+5:30

महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्स्प्रेसने १७४ मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दिल्ली येथे येत्या २४ तासांत ...

Delhi will get 120 metric tonnes of oxygen | दिल्लीला १२० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार

दिल्लीला १२० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार

Next

महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्स्प्रेसने १७४ मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दिल्ली येथे येत्या २४ तासांत पश्चिम बंगाल येथील दुर्गापूर येथून १२० मेट्रिक टन ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून आणण्यात येेईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिल्लीशिवाय तेलंगाणालाही ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून १२४ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार आहे. आतापर्यंत २५ ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून ५६ टँकर भरून ऑक्सिजन वाहतूक करण्यात आली. रेल्वेने ८१३ मेट्रिक टनहून अधिक ऑक्सिजनची वाहतूक केली. यात महाराष्ट्र १७४ मेट्रिक टन, उत्तर प्रदेश ३५५, मध्य प्रदेश १३४.७७, दिल्ली ७० तर, हरियाणा ७९ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. शुक्रवारी मध्य प्रदेशला दुसरी ७०.७७ मेट्रिक टन ऑक्सिजन एक्स्प्रेस बोकरो येथून आली असून जबलपूर येथे ऑक्सिजन दिला जाईल. आतापर्यंत महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्स्प्रेसने १७४ मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक केली आहे.

Web Title: Delhi will get 120 metric tonnes of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.