स्थानकांवर सुविधांची दैना

By admin | Published: August 17, 2015 01:13 AM2015-08-17T01:13:43+5:302015-08-17T01:13:43+5:30

मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील उपनगरीय स्थानकांवर प्रवाशांसाठी असणाऱ्या सुविधांची ऐशीतैशीच झाली आहे. एमआरव्हीसीकडून

Deliver the facilities at the stations | स्थानकांवर सुविधांची दैना

स्थानकांवर सुविधांची दैना

Next

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील उपनगरीय स्थानकांवर प्रवाशांसाठी असणाऱ्या सुविधांची ऐशीतैशीच झाली आहे. एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) स्थानकांवरील सोयी-सुविधांबाबत नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात प्रवाशांकडून प्रसाधनगृह आणि पाण्याच्या सुविधेबाबत असमाधान व्यक्त केले आहे.
प्रवाशांना सोयीसुविधा देताना प्रवाशांनाही नेमके काय हवे आहे हेदेखील मत विचारात घेण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आणि एमआरव्हीसीकडून त्याचा सर्व्हे करण्यात आला. यात एमआरव्हीसीकडून २५ हजार प्रवाशांचे मत विचारात घेण्यात आले. स्थानकांवरील सुविधा, लोकल आणि पादचारी पुलांवरील सुविधा
याबाबतचे मत घेण्यात आले. स्थानकांवरील प्रसाधनगृहांबाबत ५८ टक्के पुरुष आणि महिला असमाधानी असल्याचे मत नोंदवण्यात आले आहे. स्थानकांवर असणाऱ्या पाण्याच्या सुविधेबाबतही ५३ टक्के प्रवाशांनी असमाधानी असल्याचे मत नोंदविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Deliver the facilities at the stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.