नोव्हेंबर अखेरपर्यंत मेट्रो प्रवाशांना दिलासा; भाडेवाढ लांबणीवर

By admin | Published: October 23, 2015 02:33 AM2015-10-23T02:33:48+5:302015-10-23T02:33:48+5:30

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोच्या नवीन भाड्यासंदर्भात आणि अन्य मुद्द्यांवर सरकारशी बोलणी सुरू असल्याचे सांगत नोव्हेंबरपासून लागू होणारी भाडेवाढ महिनाभर पुढे

Deliverable to metro passengers by the end of November; Prolong the fare | नोव्हेंबर अखेरपर्यंत मेट्रो प्रवाशांना दिलासा; भाडेवाढ लांबणीवर

नोव्हेंबर अखेरपर्यंत मेट्रो प्रवाशांना दिलासा; भाडेवाढ लांबणीवर

Next

मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोच्या नवीन भाड्यासंदर्भात आणि अन्य मुद्द्यांवर सरकारशी बोलणी सुरू असल्याचे सांगत नोव्हेंबरपासून लागू होणारी भाडेवाढ महिनाभर पुढे ढकलल्याचे मेट्रोने स्पष्ट केले. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मेट्रोचे किमान तिकीट १0 रुपये तर कमाल भाडे ४0 रुपये एवढे असून, गेल्या वर्षीच्या ८ जुलैपासून हे भाडे आकारण्यात येत आहे. यानंतर रिलायन्स आणि राज्य सरकारमध्ये नवीन दरनिश्चितीवरून बराच वाद झाल्यानंतर हा वाद उच्च न्यायालयात गेला. यावर न्यायालयाने केंद्राला दरनिश्चिती समिती स्थापन करण्याचा निर्णय दिला. या समितीने तिकीट ११0 रुपयांपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली होती. मात्र विरोध लक्षात घेत मुंबई मेट्रोने ३१ आॅक्टोबरपर्यंत तिकीट दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय या वर्षीच्या जुलै महिन्यात घेतला होता. आता चर्चा सुरू असल्याचे कारण देत दरवाढ पुढे ढकलण्यात आली.

Web Title: Deliverable to metro passengers by the end of November; Prolong the fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.