CoronaVirus सायन रुग्णालयात गेल्या ३ आठवड्यांत १०३ कोरोनाग्रस्त मातांची प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 09:33 PM2020-05-14T21:33:26+5:302020-05-14T21:37:30+5:30

एक बाळ सोडून इतर बाळांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Delivery of 103 mothers who corona Positive in the last 3 weeks at Sion Hospital hrb | CoronaVirus सायन रुग्णालयात गेल्या ३ आठवड्यांत १०३ कोरोनाग्रस्त मातांची प्रसूती

CoronaVirus सायन रुग्णालयात गेल्या ३ आठवड्यांत १०३ कोरोनाग्रस्त मातांची प्रसूती

Next

मुंबई:  कोरोनाच्या छायेत सायन रुग्णालयात मागील ३ आठवड्यांत १०३ कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवती महिलांची प्रसूती करण्यात आली. विशेष म्हणजे जन्माला आलेल्या बाळांपैकी केवळ एका बाळाचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला असून इतर सर्व बाळांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती सायन रुग्णालयाचे स्त्री रोगतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ अरुण नाईक यांनी दिली.


दरम्यान प्रसूती झालेल्या सर्व माता आणि बाळांची प्रकृती चांगली असून या सर्व प्रसूती आयसीएमआरच्या नियमावलीनुसारच करण्यात आल्या आहेत. पीपीई किट्स आणि सर्व सुरक्षेने या प्रसूती करण्यात आल्या असल्याची माहिती डॉ नाईक यांनी दिली.  

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात सगळ्यात जास्त त्रास गर्भवती महिलाना आहे. मात्र आई कोरोना पॉझिटिव्ह असली तरी बाळ असेलच असे नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने आधीच स्पष्ट केले आहे. दरम्यान सायन रुग्णालयातील ही १०० नवजात बालके कोरोना निगेटिव्ह आली आहेत. यामधील २ संशयित आहेत तर पॉझिटिव्ह आलेले एक बाळ ही चार दिवसांनी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आल्याची माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ रमेश भारमल यांनी दिली.

 

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus in Mumbai मुंबई हादरली! आज नवे रुग्ण हजारासमीप; मृत्यू मात्र घटले

CoronaVirus बापरे! राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा पहिल्यांदाच १६०० पार; मृत्यू घटले

बाबो! हायवेला जागा गेली; 400 कोटींची भरपाई पाहून एकाच नावाचे १३ दावेदार प्रकटले

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'आमदार' झाले; ९ जणांचे विधान परिषद सदस्यत्व जाहीर

Atmanirbhar Bharat Abhiyan देशात कुठेही रेशनचे धान्य मिळणार, कामगारांना भाडेकरारावर घरं देणार

अवघा देश भिकेला लावला; आता पाकिस्तानी सैन्याला दणक्यात पगारवाढ हवीय

Web Title: Delivery of 103 mothers who corona Positive in the last 3 weeks at Sion Hospital hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.