एफडीएच्या इशाऱ्यानंतर डिलिव्हरी बॉइजची धावपळ, ५७५ जणांनी घेतला परवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 02:46 AM2019-03-29T02:46:53+5:302019-03-29T02:47:18+5:30
विविध आॅनलाइन कंपन्यांकडून खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉइजना अन्नपदार्थ हाताळणे आणि अन्नसुरक्षेबाबत प्रशिक्षण दिले जात नसल्याचे समोर आले आहे.
- सागर नेवरेकर
मुंबई : विविध आॅनलाइन कंपन्यांकडून खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉइजना अन्नपदार्थ हाताळणे आणि अन्नसुरक्षेबाबत प्रशिक्षण दिले जात नसल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत तसेच सुरक्षित अन्न ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्य देत डिलिव्हरी बॉइजला परवाना घेणे एफडीए (अन्न व औषध प्रशासन)ने सक्तीचे केले आहे. त्यामुळे राज्यभरातील आॅनलाइन खाद्यपदार्थ पुरविणाºया कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉइजची नावनोंदणी व परवाना घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात ५७५ डिलिव्हरी बॉइजनी परवाने घेतले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे (नाशिक विभाग)सह आयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी यासंदर्भात सांगितले की, नाशिकमध्ये स्वीगी, झोमॅटो आणि उबर इट या तिन्ही आॅनलाइन खाद्यपदार्थ पुरविणाºया कंपन्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यापैकी स्वीगीच्या ५७५ डिलिव्हरी बॉइजनी परवाने घेतले आहेत. झोमॅटोकडूनही यासाठीची नोंदणी सुरू आहे. मात्र, उबर इट कंपनीने अजूनही प्रतिसाद दिलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
...तर कारवाई होणार
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले की, एफडीएने ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोहीम सुरू केली आहे. यात आॅनलाइन खाद्यपदार्थ पुरविणाºया कंपन्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन नोंदणी करावी. ज्या आॅनलाइन कंपन्या डिलिव्हरी बॉइजची नोंदणी आणि परवाना घेणार नाहीत त्यांच्यावर एफडीए कारवाईचा बडगा उगारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.