डेल्टाबद्दल संशोधन होणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:06 AM2021-06-23T04:06:02+5:302021-06-23T04:06:02+5:30
व्हेरियंटवर मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल काम करत नाहीत, अशी माहिती आहे, पण त्याचा अर्थ हा खूप जास्त गंभीर व्हेरियंट आहे ...
व्हेरियंटवर मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल काम करत नाहीत, अशी माहिती आहे, पण त्याचा अर्थ हा खूप जास्त गंभीर व्हेरियंट आहे असा घेता येत नाही, असेही तज्ज्ञांचे मत आहे. कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या भारतीय लसी डेल्टा व्हेरियंटवर किती प्रभावी ठरतात, याबद्दल मतमतांतरे आहेत, डेल्टा प्लसवरची त्यांची परिणामकारकता तपासण्यासाठी अजून काहीकाळ आणि संशोधन गरजेचे आहे.
- डाॅ. शिवकुमार उत्तुरे, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद
.....................................
अतिरिक्त चिंतेची गरज नाही
आपण जिनोम सिक्वेन्सिंग करत राहावे, डेल्टा प्लस व्हेरियंटवर लक्ष ठेवावे. भविष्यात आणखी व्हेरियंट्स येण्याची शक्यता आहे, त्यामुळे सगळ्याच राज्य सरकारांनी तयारी करणे गरजेचे आहे. सध्या तरी अतिरिक्त चिंता करण्याची गरज नाही.
- डॉ. राहुल पंडित, राज्य कोरोना टास्क फोर्स
.........................