गृहनिर्माण सोसायटीवर प्रशासक नेमण्यासाठी लाचेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:07 AM2021-02-13T04:07:08+5:302021-02-13T04:07:08+5:30
उपनिबंधकासह, सहकार अधिकारी एसीबीच्या जाळयात गृहनिर्माण सोसायटीवर प्रशासक नेमण्यासाठी लाचेची मागणी उपनिबंधकासह, सहकार अधिकारी एसीबीच्या जाळयात लोकमत न्यूज नेटवर्क ...
उपनिबंधकासह, सहकार अधिकारी एसीबीच्या जाळयात
गृहनिर्माण सोसायटीवर प्रशासक नेमण्यासाठी लाचेची मागणी
उपनिबंधकासह, सहकार अधिकारी एसीबीच्या जाळयात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गृहनिर्माण सोसायटीवर प्रशासक नेमण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी उपनिबंधकासह सहकार अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले. यात सहकार अधिकाऱ्याला एक लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
तक्रारदार यांनी ते राहत असलेल्या सोसायटीतील पदाधिकारी व सचिवांनी मिळून सोसायटीच्या कामकाजात अनियमितता असल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी वांद्रे पश्चिमेतील उपनिबंधक कार्यालयात १० फेब्रुवारी राेजी अर्ज दिला होता. तक्रारीवरून त्यांच्या सोसायटीवर प्रशासक नेमतो, संबंधितांवर कारवाई करतो असे सांगून, सहकार अधिकारी गणेश राठोड (वय ३४) यांनी स्वतःसह उपनिबंधक गौतम वर्धन यांच्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदारांनी एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला आणि राठोड यांना तडजाेडीअंतीचे एक लाख रुपयेे स्वीकारताना रंगेहात अटक केली.
...........................................