Join us

राज्यातील शैक्षणिक संस्था जून अखेर पर्यंत बंद ठेवण्याची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 3:42 PM

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन अभ्यासक्रम कक्ष सुरु करावा  : भाजपा शिक्षक आघाडीची राज्य शासनाकडे मागणी

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन वाढण्याची शक्यता यांमुळे राज्यातील केजी टू पीजीपर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्था जून महिना अखेर बंदच ठेवण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीने राज्य शासनाकडे केली आहे. भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री तसेच शिक्षण सचिवांना पत्र पाठविले असून त्यात ही मागणी केली आहे.

 

केंद्र शासनाच्या कोविड-१९ वर काम करणाऱ्या मंत्रीगटाने देखील कालच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत देशातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची शिफारस केली आहे. राज्यात आणि विशेषतः मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या पाहता १४ एप्रिल नंतरही शाळा व महाविद्यालये बंदच ठेवणे गरजेचे आहे. शाळांमधील प्रत्येक तुकडीचा पट ५० हुन व त्यापेक्षाही अधिक असतो. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले आहे. इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांची राहिलेली परीक्षाही रद्द करून सरासरी गुण देऊन त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा जेणेकरून विद्यार्थी सुट्टीच्या काळात १० वी व १२ विचा अभ्यास सुरू करू शकतील असे मतही त्यांनी मांडले आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम कक्ष सुरू  करावालॉकडाउन वाढल्यास सुट्टीकाळात विद्यार्थ्यांना पुढील इयत्तांचा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी विविध अँप तसेच तंत्रस्नेही शिक्षकांनी बनविलेल्या ऍप च्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवावा त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन अभ्यासक्रम कक्ष सुरू करावा अशी मागणीही अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.

टॅग्स :शाळाकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस