ओलाविरोधात चालक-मालकांचा मोर्चा, मासिक मिळकत हमी कराराद्वारे देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 06:59 AM2017-09-20T06:59:26+5:302017-09-20T06:59:28+5:30
मासिक मिळकतीची हमी कराराद्वारे देण्याची मागणी करत ओला चालक-मालकांनी मंगळवारी कंपनीच्या अंधेरी येथील कार्यालयावर धडक दिली.
मुंबई : मासिक मिळकतीची हमी कराराद्वारे देण्याची मागणी करत ओला चालक-मालकांनी मंगळवारी कंपनीच्या अंधेरी येथील कार्यालयावर धडक दिली. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली कुर्ला येथून निघालेला मोर्चा मूक स्वरूपाचा होता.
कामगार संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी सांगितले की, कंपनीने कराराद्वारे चालक व मालकांना निश्चित मासिक मिळकतीची हमी देण्याची मागणी आहे. याशिवाय नव्या गाड्यांची नोंदणी थांबवून चालक आणि मालक यांना जीवन विमा योजनेचा लाभ द्यावा. चालक-मालकांवर वारंवार दंडात्मक कारवाई करून कंपनी आर्थिक शोषण करत आहे. ते थांबवून कंपनीला या गाड्यांमुळे होणाºया नफ्याचे समान वाटप करावे.
कामगार संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर कंपनीने मागण्या मान्य केल्या नाही, तर चालक आणि मालक संपावर जातील, असा इशारा कामगार संघाने दिला आहे.