उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:15 AM2018-04-09T02:15:52+5:302018-04-09T02:15:52+5:30
उन्हाळ्यात वीज उपकरणे अधिक काळ सुरू राहतात. त्यामुळे मुंबईच्या विजेच्या मागणीत वाढ नोंदविण्यात आल्यास, आपल्या वीज ग्राहकांना अधिकचा वीजपुरवठा करण्यास रिलायन्स एनर्जी सज्ज झाली आहे.
मुंबई : उन्हाळ्यात वीज उपकरणे अधिक काळ सुरू राहतात. त्यामुळे मुंबईच्या विजेच्या मागणीत वाढ नोंदविण्यात आल्यास, आपल्या वीज ग्राहकांना अधिकचा वीजपुरवठा करण्यास रिलायन्स एनर्जी सज्ज झाली आहे. वाढत्या विजेची मागणी लक्षात घेता रिलायन्सकडून अतिरिक्त वीज खरेदीची व्यवस्था करण्यात आली आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात रिलायन्सच्या वितरण क्षेत्रात विजेची मागणी १६५० मेगावॅटपर्यंत जाऊ शकते. परिणामी, या काळात वीज ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून रिलायन्सने १२६२ मेगावॅट विजेचा दीर्घकालीन करार केला आहे. तसेच २५० मेगावॅट अतिरिक्त वीज करार करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त गरज भासल्यास बाजारातून अधिक वीज घेण्याची तयारी रिलायन्सने केली आहे. १ जून २०१७ रोजी रिलायन्सच्या विजेची मागणी १६०५ मेगावॅटवर गेली होती. या काळात विजेची मागणी दुपारी जास्त नोंदवण्यात आली होती. पावसाळ्यानंतर तापमान वाढल्यामुळे ६ आॅक्टोबर २०१७ रोजी विजेची मागणी १५५० मेगावॅटवर गेली होती.
ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून रिलायन्सने १२६२ मेगावॅट विजेचा दीर्घकालीन करार केला आहे. तसेच २५० मेगावॅट अतिरिक्त वीज करार करण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त गरज भासल्यास बाजारातून अधिक वीज घेण्याची तयारी रिलायन्सने केली आहे.
वर्ष जास्त विजेची तारीख
मागणी
२०१४-२०१५ १४८७ १० जून २०१४
२०१५-१६ १५५२ १४ आॅक्टोबर २०१५
२०१६-१७ १६२२ ९ जून २०१६
२०१७-१८ १६०५ १ जून २०१७