एअरपोर्ट पार्किंगमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 07:01 PM2020-06-07T19:01:26+5:302020-06-07T19:01:41+5:30
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अशा रुग्णांसाठी मुंबई विमानतळावरील पार्किंग च्या जागेत क्वारंन्टाईन सेंटर उभारण्याची मागणी पुढे आली आहे.
मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अशा रुग्णांसाठी मुंबई विमानतळावरील पार्किंग च्या जागेत क्वारंन्टाईन सेंटर उभारण्याची मागणी पुढे आली आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष व नवभारतीय शिव वाहतूक संंघटनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी ही मागणी सरकारकडे केली आहे.
सर्व पातळ्यांवर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका अपयशी ठरली असल्याचा आरोप शेख यांनी केला. कोरोना उपचाराच्या नावाखाली गोरगरीब जनतेची लूट सुरु आहे. मुंबईकरांना सध्या लोकल ट्रेन नको तर रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळणे जास्त गरजेचे आहे. बीकेसी मैदानापेक्षा एअरपोर्ट पार्किंगमध्ये क्वारंटाईन सेंटरची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केेले आहे. सरकारने गोरगरीब जनतेला कोरोनाच्या उपचारासाठी सुविधा पुरवून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेख यांनी केली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सरकार लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला.