संशोधन क्षेत्रात ‘फ्रेशर्स’ची मागणी वाढली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:49 AM2017-09-15T06:49:34+5:302017-09-15T06:50:29+5:30

आयआयटी बॉम्बेमधील शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून, यंदा ‘रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ (आर अ‍ॅण्ड डी) या क्षेत्रात फेशर्सची मागणी वाढल्याचे चित्र आहे. तब्बल ११८ जणांना आर अ‍ॅण्ड डीमध्ये नोकरी मिळाली आहे.

 The demand for 'freshers' in the field of research has increased | संशोधन क्षेत्रात ‘फ्रेशर्स’ची मागणी वाढली  

संशोधन क्षेत्रात ‘फ्रेशर्स’ची मागणी वाढली  

मुंबई : आयआयटी बॉम्बेमधील शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून, यंदा ‘रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ (आर अ‍ॅण्ड डी) या क्षेत्रात फेशर्सची मागणी वाढल्याचे चित्र आहे. तब्बल ११८ जणांना आर अ‍ॅण्ड डीमध्ये नोकरी मिळाली आहे. आयआयटी बॉम्बेमधील तब्बल १ हजार ११४ जणांना या वर्षात नोकरी मिळाली आहे. तर, सरासरी पगार हा वर्षाला ११ लाख ४१ हजार रुपये इतका आहे.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी दोन टप्प्यांत नोकर भरती करण्यात आली होती. आता ही नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अभियांत्रिकी, आर अ‍ॅण्ड डी, कन्सल्टिंग, अ‍ॅनालिस्टिक, सॉफ्टवेअर या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. नोकर भरतीच्या दोन्ही सत्रांत मिळून ३०५ कंपन्या आयआयटीमध्ये सहभागी झाल्या होत्या. परदेशी कंपन्यांपैकी जपान, तैवान, सिंगापूर या देशांतील कंपन्यांनी सर्वाधिक विद्यार्थ्यांना नोकरी दिल्याची माहिती आयआयटी बॉम्बेच्या प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली. ‘आर अ‍ॅण्ड डी’ क्षेत्रातील ३२ कंपन्या नोकर भरतीमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये ११८ जणांना नोकरी देण्यात आली आहे. नोकर भरती प्रक्रियेच्या सुरुवातीला इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर - हार्डवेअर, डाटा अ‍ॅनालिसिस्ट, मॅनेजमेंट कन्सल्टिंग, फायनान्स, बँकिंग या क्षेत्रांचे वर्चस्व दिसून आले. सध्या मार्केटमध्ये नोकºया कमी प्रमाणात असल्या तरीही आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थ्यांना चांगल्या नोकºया मिळाल्या आहेत. आयआयटी बॉम्बेतून पीपीओजदेखील विद्यार्थ्यांना नोकºया देत आहेत. ६७ विद्यार्थ्यांना परदेशातील नोकºया मिळाल्या. तर, ५९ विद्यार्थ्यांना ‘प्री-प्लेसमेंट’ मिळाल्या आहेत.

११० विद्यार्थ्यांना
प्री-प्लेसमेंट आॅफर्स
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील ११० विद्यार्थ्यांना प्री-प्लेसमेंट आॅफर्स मिळाल्या आहेत. या वर्षातील नोकर भरती प्रक्रिया आता १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. इंटर्नशीपसाठी आयआयटी बॉम्बेमध्ये जापनिस कंपन्या आल्या होत्या.

Web Title:  The demand for 'freshers' in the field of research has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई