Join us

समुद्रात असलेल्या नाविकांना सुरक्षित रित्या घरी आणण्याची उपाययोजना आखण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:38 PM

दोन लाख भारतीय नाविकांना घरी परत आणण्यासाठी मागणी केली जात आहे.

मुंबई : जगाच्या विविध समुद्रात कर्तव्यावर असलेल्या सुमारे दोन लाख भारतीय नाविकांना सुरक्षित रित्या घरी परत आणण्यासाठी सरकारने व नौकावहन मंत्रालयाने उपाययोजना आखण्याची मागणी केली जात आहे. 

जगभरातील विविध कंपन्यांच्या जहाजांवर, मालवाहू जहाजांवर सुमारे दोन लाख दहा हजारपेक्षा अधिक भारतीय नाविक व या क्षेत्रातील अधिकारी कर्तव्यावर तैनात आहेत. त्यापैकी सुमारे एक लाख नव्वद हजार जण विदेशी जहाजांवर तैनात आहेत.  इंटरनँशनल चेंबर ऑफ शिपिंगच्या एका अभ्यासानुसार,  जगभरात दर महिन्याला सुमारे एक लाख नाविक कामावरुन घरी परततात.  मात्र गेल्या तीन महिन्यात जगभरात कोविड 19 ने धुमाकूळ घातलेला असल्याने विविध देशांनी जहाजांच्या येण्या जाण्यावर व नाविकांना देशात प्रवेश देण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे सध्या ही प्रक्रिया ठप्प झालेली आहे. परिणामी या नाविकांना आपल्या देशात, आपापल्या घरी परतणे अशक्य झाले आहे. जगभरात सध्या चाळीस हजारपेक्षा अधिक भारतीय नाविक विविध मालवाहू जहाजे व प्रवासी जहाजांवर अडकले आहेत. मायदेशी परतण्यासाठी ते आतुर झाले आहेत. या नाविकांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा दर्जा 

जे नाविक कोरोना बाधित प्रदेशातून भारतात प्रवेश करतील त्यांना चौदा दिवसांसाठी सक्तीचे कॉरन्टाईन करावे. केंद्र सरकारचे नौकावहन मंत्रालय नौकावहन महासंचालक कार्यालय (डीजी शिपिंग) यांनी या नाविकांना आवश्यक ते सहाय्य करावे व विविध देशांच्या राजदूताशी संपर्क साधून त्यांना त्या त्या प्रदेशात सर्व आवश्यक बाबी मिळतील याची दक्षता घ्यावी व संरक्षित रित्या देशात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी  वॉचडॉग फाऊंडेशनतर्फे निकोलस अल्मेडा व अँड गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या