वृत्तपत्र विक्रेत्यांची संरक्षणाची मागणी

By admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:08+5:302016-03-16T08:36:08+5:30

वृत्तपत्र विक्रेत्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईच्या प्रकरणात स्वत: लक्ष घालून वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण मिळवून देण्यात यावे, असे साकडे मुंबई-ठाणे वृत्तपत्र विक्रेता एकीकरण

The demand for protection of newspaper vendors | वृत्तपत्र विक्रेत्यांची संरक्षणाची मागणी

वृत्तपत्र विक्रेत्यांची संरक्षणाची मागणी

Next

मुंबई : वृत्तपत्र विक्रेत्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईच्या प्रकरणात स्वत: लक्ष घालून वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण मिळवून देण्यात यावे, असे साकडे मुंबई-ठाणे वृत्तपत्र विक्रेता एकीकरण समितीने पालिका आयुक्त अजय मेहता यांना घातले आहे़ फेरीवाला धोरणामध्ये या मागणीचा विचार करण्यात येईल, अशी हमी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे़
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असतो़ मात्र या पत्रकारांचे वृत्त व विचार वृत्तपत्राच्या माध्यमातून घराघरांपर्यंत पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉल्सवर कारवाई केली जाते़ म्हणून शासनाकडून या घटकास संरक्षण मिळावे, यासाठी आयुक्तांनी लक्ष घालून शासन दरबारी प्रश्न मांडावा, अशी मागणी या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केली़
या बैठकीस उपमहापौर अलका केळकरही उपस्थित होत्या़ तसेच समितीचे अजित पाटील, प्रेमेंद्र पांडे, सुशांत वेंगुर्लेकर आणि उमेश यादव हजर होते़ आयुक्तांनी निवेदन घेऊन फेरीवाला धोरण ठरविताना वृत्तपत्र विक्रेत्यांचाही विचार केला जाईल, असे आश्वासन दिले़ (प्रतिनिधी)

Web Title: The demand for protection of newspaper vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.