तंबाखू विक्रेत्याकडून खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:07 AM2021-04-09T04:07:20+5:302021-04-09T04:07:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्वतःला लाचलुचपत खात्यातील अधिकारी असल्याची बतावणी करत तंबाखू व्यावसायिकाकडून एक लाखांची खंडणी मागण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्वतःला लाचलुचपत खात्यातील अधिकारी असल्याची बतावणी करत तंबाखू व्यावसायिकाकडून एक लाखांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी तिघांवर मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मालाड पश्चिम परिसरात राहणाऱ्या मधुकर भोसले नामक व्यक्तीने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. उदयकुमार पारेख व महेश सोनी नामक दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ५ एप्रिलमध्ये हे दोघे भोसले यांच्या कारखान्यात गेले आणि बनावट ओळखपत्र दाखवत स्वतःला लाचलुचपत अधिकारी म्हणवू लागले. त्यांनी भोसले यांच्या कामगाराला सोबत घेतले आणि त्याच्याकडून एक लाखांची मागणी केली. त्यावर त्याने याबाबत मालकाला कळविले. मालकाने मालाड पोलिसांना तक्रार केली व पोलिसांनी दोघांना अटक केली, तर त्यांचा तिसरा साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.