Join us

एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर चालवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 3:01 AM

मार्च २०२० मध्ये दुसरी एसी लोकल आसनगाव व बदलापूर चालावी, अशी मागणी प्रवासी संघटनेने मध्य रेल्वेकडे केली.

मुंबई : लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाइल चार्जिंग पॉइंट बसविण्यात यावेत, अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याआधी आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित (एसी) लोकल लवकरात लवकर सुरू करण्याबाबत बुधवारी रेल्वे प्रशासन आणि प्रवासी संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत पहिली एसी लोकल ट्रान्स हार्बरवरील ठाणे-वाशी-पनवेल या मार्गावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबर मार्च २०२० मध्ये दुसरी एसी लोकल आसनगाव व बदलापूर चालावी, अशी मागणी प्रवासी संघटनेने मध्य रेल्वेकडे केली.

मध्य रेल्वेवर बुधवारी प्रवासी संघटना आणि मध्य रेल्वे प्रशासनात नवीन एसी लोकलमधील अपुºया सुविधांवर बैठक आयोजित केली होती. तसेच नियमित लोकल फेरी रद्द न करता एसी लोकल स्वतंत्र चालवा. १२ डबा लोकलला ३ एसी डब्यांची जोडणी करावी, डोंबिवलीच्या नवीन पादचारी पुलाचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण करावे, आदी मागण्या संघटनेने केल्या.

टॅग्स :हार्बर रेल्वेएसी लोकलभारतीय रेल्वेमध्य रेल्वेप्रवासी