पगारवाढीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप, बँकांचे व्यवहार झाले ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 05:18 AM2020-02-01T05:18:58+5:302020-02-01T05:20:02+5:30

युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे बँक कर्मचारी आणि अधिकाºयांनी निदर्शने केली.

Demand for salary hike: Employees closed, bank transactions closed | पगारवाढीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप, बँकांचे व्यवहार झाले ठप्प

पगारवाढीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप, बँकांचे व्यवहार झाले ठप्प

Next

मुंबई : पगारवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळेबँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे दुपारनंतर एटीएममध्ये खडखडाट झाला असून आॅनलाइन व्यवहारांवर भिस्त असणार आहे. दरम्यान, संपामुळे अर्थव्यवस्थेला ३० हजार कोटींचा फटका बसला असल्याचा दावा युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनच्या वतीने करण्यात आला आहे. युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे बँक कर्मचारी आणि अधिकाºयांनी निदर्शने केली. या वेळी इनबेफचे सुभाष सावंत, एनसीबीईचे जगदीश शृंगारपुरे, आयबोकचे नीलेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

याबाबत युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर म्हणाले की, राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी-कर्मचाºयांनी दोन दिवसांचा संप पुकारला पहिल्याच दिवशी बँकांच्या व्यवहारांवर परिणाम झाल्याचे पाहावयास मिळाले. बँकांमधून होणारे व्यवहार ठप्प पडले होते. त्यात आरटीजीएस, एनईएफटी, चेक क्लीअरन्स, खात्यामधून रक्कम काढणे, रक्कम जमा करणे ही सर्व कामे ठप्प होती. त्यामुहे दोन दिवसांत सात लाख कोटींचे चेक वटले जाणार नाहीत. आजच्या दिवशी अर्थव्यवस्थेला ३० हजार कोटींचा फटका बसल्याचे तुळजापूरकर म्हणाले. दोन दिवसांच्या संपानंतरही सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली नाही तर पुन्हा ११ ते १३ मार्चदरम्यान संप करू, असा इशाराही त्यांनी दिला.

काय आहेत मागण्या?
पगारपत्रकाच्या घटकांवर २० टक्के वेतनवाढ द्यावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, स्पेशल अलाऊन्स हा मूळ वेतनात समाविष्ट करावा, एनपीएस योजना निकाली काढावी, पेन्शनमध्ये सुधारणा करा, अधिकाºयांसाठी कामाचे तास निश्चित करावेत, कंत्राटी कर्मचाºयांना समान वेतन द्यावे इत्यादी.

वीस बँकांच्या कर्मचा-यांचा सहभाग
या संपात २० राष्ट्रीयीकृत बँकांचे सुमारे दहा लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यात ९ संघटना, २० राष्ट्रीयीकृत बँका, ८ जुन्या खासगी बँका, ६ विदेशी बँका, ४६ प्रादेशिक ग्रामीण बँकांतील अधिकारी आणि कर्मचारी संपावर गेले आहेत.

पगारवाढीसाठी ३२ महिने संयमाने वाट पाहून निर्णय न झाल्यामुळे संपाचे पाऊल उचलावे लागले. दोन दिवसांच्या संपात बँक कर्मचारी आणि अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. संपाचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे.
- एस. नागराजन, सरचिटणीस, एआयबीओए

Web Title: Demand for salary hike: Employees closed, bank transactions closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.