पालिका रुग्णालयांमध्ये कॉस्मेटिक सर्जरी केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 07:10 AM2018-04-04T07:10:26+5:302018-04-04T07:10:26+5:30
कॉस्मेटिक शस्त्रक्रिया महागडा उपचार असल्याने सर्वसामान्यांना तो परवडत नाही़ त्यामुळे व्यंग असलेल्या अनेकांना पैशांअभावी उपचार घेणे शक्य होत नाही़ त्यामुळे अशा रुग्णांना दिलासा देण्यासाठी, मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये कॉस्मेटिक सर्जरीचे केंद्र सुरू करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका महासभेत करण्यात आली आहे़
मुंबई - कॉस्मेटिक शस्त्रक्रिया महागडा उपचार असल्याने सर्वसामान्यांना तो परवडत नाही़ त्यामुळे व्यंग असलेल्या अनेकांना पैशांअभावी उपचार घेणे शक्य होत नाही़ त्यामुळे अशा रुग्णांना दिलासा देण्यासाठी, मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये कॉस्मेटिक सर्जरीचे केंद्र सुरू करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका महासभेत करण्यात आली आहे़
सुंदर दिसण्यासाठी, तसेच स्थूलतेमुळे निर्माण होणाऱ्या व्याधींवर मात करण्यासाठी श्रीमंत मंडळी अशा महागड्या कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करून घेतात. शारीरिक व्यंग, अपघात, यामुळे निर्माण झालेले दोष दूर करण्याकरिता महापालिकेने अशी केंद्रे उभी केल्यास, हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे़ सभागृह नेते यशवंत जाधव यांनी असे केंद्र सुरू करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे़
अपघात, शारीरिक दोष आणि व्यंगामुळे लहान वयात आलेल्या विकृती आदींवर प्लॅस्टिक सर्जरी व कॉस्मेटिक सर्जरीद्वारे उपचार करणे शक्य असते़ महापालिकेच्या रुग्णालयात मुंबई व मुंबईबाहेरील रुग्ण उपचारासाठी येत असतात़ गरजू रुग्णांना या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा लाभ घेता यावा, तसेच योग्य वैद्यकीय कारणांसाठी या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने अशा उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली.
सुंदर दिसण्यासाठी, तसेच स्थूलतेमुळे निर्माण होणाºया व्याधींवर मात करण्यासाठी श्रीमंत मंडळी अशा महागड्या कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करून घेतात. शारीरिक व्यंग, अपघात, यामुळे निर्माण झालेले दोष दूर करण्याकरिता महापालिकेने अशी केंद्रे उभी केल्यास, हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे़