मेट्रो तीनसह सहासाठी हवी एकच कारशेड, पर्यावरण तज्ज्ञांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 02:17 AM2019-05-14T02:17:09+5:302019-05-14T02:17:18+5:30

रेल्वे मार्गिका न जोडलेल्या भागांना मेट्रो-३ मार्गिकेद्वारे जोडण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. मात्र या मार्गिकेमध्ये काही झाडे बाधित होणार आहेत. तसेच आरेमध्ये उभारण्यात येणाऱ्या कारशेडसाठीही झाडे तोडावी लागणार आहेत.

Demand for a single carshade with a trio of three, environmental expert demand | मेट्रो तीनसह सहासाठी हवी एकच कारशेड, पर्यावरण तज्ज्ञांची मागणी

मेट्रो तीनसह सहासाठी हवी एकच कारशेड, पर्यावरण तज्ज्ञांची मागणी

Next

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो तीन भुयारी मार्गिकेसाठी आरे कॉलनीमध्ये कारशेडची उभारणी करण्यात येणार आहे. यासह कांजूरमार्ग ते लोखंडवाला ही मेट्रो सहा मार्गिका भुयारी बनवून दोन्ही कारशेड एकाच ठिकाणी करावेत, अशी मागणी पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) याबाबत जनमतही मागवले आहे.
रेल्वे मार्गिका न जोडलेल्या भागांना मेट्रो-३ मार्गिकेद्वारे जोडण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. मात्र या मार्गिकेमध्ये काही झाडे बाधित होणार आहेत. तसेच आरेमध्ये उभारण्यात येणाऱ्या कारशेडसाठीही झाडे तोडावी लागणार आहेत.
यामुळे भविष्यात उभारण्यात येणाºया मेट्रो मार्गिकांच्या कारशेडसाठी आणखी झाडांची कत्तल होऊ नये म्हणून आणि कारशेड उभारण्याच्या खर्चामध्ये बचत व्हावी यासाठी अनेक पर्यावरण संस्थांनी मेट्रो सहा मार्गिकाही भूमिगत करण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ल अमलात आणल्यास निसर्गाच्या संवर्धनासह मेट्रोचाही फायदा होईल, असे मत पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
एमएमआरडीएच्या माध्यमातून लोखंडवाला-जोगेश्वरी-विक्रोळी-कांजूरमार्ग ही मेट्रो सहा मार्गिका उन्नत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे या मार्गिकेचे कारशेड पूर्णत: वेगळे असणार आहे. यासाठी एमएमआरडीए प्राधिकरणाकडून २१ मे रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत जनमत मागविण्यात आले आहे.
याबाबत पर्यावरण कार्यकर्त्यांनी दिलेली मते एमएमआरडीए विचारात घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कारडेपो एकच असल्यास त्यामुळे सुमारे ३ हजार ५०० झाडांची कत्तल थांबविण्यात यश मिळेल, असे मत व्यक्त पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Demand for a single carshade with a trio of three, environmental expert demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो