रंगभूमी दिनापासून नाट्यगृहे सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:08 AM2021-09-04T04:08:37+5:302021-09-04T04:08:37+5:30
मुंबई : राज्यातील नाट्यगृहे खुली करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ...
मुंबई : राज्यातील नाट्यगृहे खुली करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नाट्यगृहांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, लसीकरणासह आवश्यक प्रक्रिया निर्मात्यांनी पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्याचे आदेश बांदेकर यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली नाट्यगृहे सुरू करावीत, यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ कांबळी, मंगेश कदम, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर, रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर वेल्ले, विजय केंकरे, विजय राणे आदी रंगकर्मींनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आदेश बांदेकर, सुबोध भावे उपस्थित होते. रंगभूमी दिनाचे औचित्य साधत ५ नोव्हेंबर २०२१पासून ५० टक्के प्रेक्षक उपस्थितीमध्ये राज्यातील नाट्यगृहे सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.