सिनेट निवडणुकीविरोधात राज्यपालांना देणार पत्र, सुमोटो घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 02:18 AM2018-01-11T02:18:21+5:302018-01-11T02:19:01+5:30

मुंबई विद्यापीठात सध्या सिनेट निवडणुकांची लगबग सुरू आहे. निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे. मात्र शिक्षक संघटनांनी घेतलेल्या हरकतींकडे दुर्लक्ष करून ही निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे आता शिक्षक संघटना राज्यपाल आणि मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिणार आहेत.

The demand for summoning the letter given to the governor against the Senate election | सिनेट निवडणुकीविरोधात राज्यपालांना देणार पत्र, सुमोटो घेण्याची मागणी

सिनेट निवडणुकीविरोधात राज्यपालांना देणार पत्र, सुमोटो घेण्याची मागणी

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठात सध्या सिनेट निवडणुकांची लगबग सुरू आहे. निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे. मात्र शिक्षक संघटनांनी घेतलेल्या हरकतींकडे दुर्लक्ष करून ही निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे आता शिक्षक संघटना राज्यपाल आणि मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेवर सुमोटो घेण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे मुंबई युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशनने (मुक्ता) सांगितले.
नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यावर सिनेट निवडणुकांचे बिगुल वाजले. मुंबई विद्यापीठाने पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची तारीख जाहीर केली. पण, या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले. हरकती घेण्यात आल्या. तरीही विद्यापीठाने निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. निवडणूक प्रक्रियेतील गोंधळ थांबविण्यासाठी राज्यपाल आणि मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिणार असल्याचे मुक्ताचे सचिव सुभाष आठवले यांनी सांगितले.

निवडणूक प्रक्रियेत गोंधळ
मतदार यादी तयार करताना त्यात बदल करण्याची तरतूद नव्हती. तरीही यादीत बदल करण्यात आला आहे. तसेच २२ शिक्षकांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रांसह पुरावे दिले होते. पण, या शिक्षकांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.
पहिल्या दोन याद्यांमध्ये डीएडच्या शिक्षकांच्या नावांचा समावेश होता. अंतिम यादीत त्यांना वगळण्यात आले आहे. शिक्षकांची मान्यता कॉमर्स, इकॉनॉमिक्स विषयांत असताना बिझनेस मॅनेजमेंट आणि बिझनेस इकॉनॉमिक्स या अभ्यास मंडळांवर करण्यात आली.
विद्यापीठाकडून याबाबत उत्तर न आल्याने सुमोटो अ‍ॅक्शन घेण्याची मागणी करणार असल्याचे आठवले म्हणाले.

Web Title: The demand for summoning the letter given to the governor against the Senate election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.