अभिनेता दिलीप जोशी उर्फ जेठालाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By मनोहर कुंभेजकर | Published: October 26, 2023 05:29 PM2023-10-26T17:29:50+5:302023-10-26T17:30:11+5:30
अभिनेता दिलीप जोशी उर्फ जेठालाल यांनी आदिवासी समाजाला अमावसी म्हणत सार्वजनिक सोशल मीडियाद्वारे अपमान केला असा आरोप करण्यात आला आहे.
मुंबई - तारक मेहता का उल्टा चश्मा फेम अभिनेता दिलीप जोशी उर्फ जेठालाल यांनी आदिवासी समाजाचा सोशल मीडियाद्वारे व्हाट्सअँपच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा अपमान केला आहे. मुंबई आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल कुमरे यांनी अभिनेता दिलीप जोशी उर्फ जेठालाल यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ पुन्हा दाखल करण्यासाठी आरे पोलीस स्टेशनमध्ये निवेदन सादर केले.
अभिनेता दिलीप जोशी उर्फ जेठालाल यांनी आदिवासी समाजाला अमावसी म्हणत सार्वजनिक सोशल मीडियाद्वारे अपमान केला. यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या तसेच लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुनिल कुमरे यांनी केली आहे.यावेळी उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष क्लाइव्ह डायस, मुंबई आदिवासी काँग्रेसचे उपाध्यक्ष कैलास पटेल, मुंबई आदिवासी काँग्रेसचे महासचिव संजय फरले, ब्लॉक अध्यक्ष राहुल उगले, सुरज गुप्ता, धर्मराज तोकला, भरत पांचाळ चंद्रकांत धोडीया आदी उपस्थित होते.