Join us

विद्यार्थ्यांवर बंदुका रोखल्या जातात त्या देशाची लोकशाही आणि देश संकटात: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 12:45 PM

पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता.

मुंबई: नागिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे प्रकरण सध्या तापले आहे. विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर जाळपोळ आणि हिंसाचाराचे प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता. या सर्व प्रकारावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, ज्या देशांमध्ये विद्यार्थ्यांवर बंदुका रोखल्या जातात, त्यांचे आंदोलन दडपले जाते त्या देशाची लोकशाहीसोबतच देश देखील संकटात असतो असा जगभराचा अहवास असल्याचे संजय राऊत सांगत भाजपावर टीका केली आहे. 

भाजपाचे नेते एकनाथ खडसे आपल्या पक्षात यावं असं सर्व प्रमुख पक्षांना वाटतं. मात्र खडसे वारंवार म्हणत आहेत की मी पक्ष सोडणार नाही. त्यामुळे याबाबत खडसेंनीच निर्णय घ्याव असं संजय राऊत यांनी सांगितले आहे. शिवसेना पक्षात खडसेंनी प्रवेश करावा असं तुम्हाला वाटतं का या प्रश्नावर राजकारण आता विचारधारेवर फार चालत नाही. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कलंक म्हटलं तेच आज भाजपाच्या बाकेवर बसलेले दिसून येत असल्याचे देखील संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. तसेच महाराष्टाची योग्य दिशेनं वाटचाल चालली असून राज्याचे जनहिताचे निर्णय घेण्यासाठी सत्तेत असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :नागरिकत्व सुधारणा विधेयकसंजय राऊतभाजपामहाराष्ट्र सरकारएकनाथ खडसेराष्ट्रवादी काँग्रेसपोलिसविद्यार्थी