बोरिवलीतील चिकूवाडीमधल्या श्रमिक बेघरांच्या झोपड्यांची तोडमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:05 AM2021-07-08T04:05:43+5:302021-07-08T04:05:43+5:30
मुंबई : आर-मध्य विभाग बोरिवली या मुंबई मनपाच्या परिरक्षण विभागाने चिकूवाडी बोरिवली (पश्चिम) येथील नाल्याच्या शेजारी राहणाऱ्या ४५ श्रमिक ...
मुंबई : आर-मध्य विभाग बोरिवली या मुंबई मनपाच्या परिरक्षण विभागाने चिकूवाडी बोरिवली (पश्चिम) येथील नाल्याच्या शेजारी राहणाऱ्या ४५ श्रमिक बेघर कुटुंबीयांचे बांधकाम बुधवारी निष्कासन केले. या निष्कासनामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या श्रमिक बेघरांचे अन्नधान्य, प्लास्टिक, बांबू आणि शाळकरी मुलांची वह्या, पुस्तके तसेच शासकीय कामात उपयोगी पडणारे आधारकार्ड आणि महत्त्वाची कागदपत्र यांचे नुकसान करण्यात आले आहे.
यावेळी सेंटर फॉर प्रोमोटींग डेमॉक्रॅसीचे योगेश बोले, पूजा कांबळे या कार्यकर्त्यांनी महापालिका आणि पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि शासन निर्णय याची माहिती देण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित अधिकाऱ्यांनी न ऐकताच तोडमोडीची कारवाई पूर्ण केली.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे याच श्रमिक बेघर लोकांकडून बोरिवलीतील नाले साफ करवून घेतले जातात. त्याचवेळी ते राहात असलेल्या झोपड्यांची तोडमोड करण्यात आली आहे. शहर साफ करणाऱ्यांना राहण्यासाठी थांबू दिले जात नाही. त्यांनी कुठे बसावे? असा प्रश्न स्थानिक नालासफाईचे काम करणारे लक्ष्मण काळे यांनी यावर विचारला आहे.