Join us

सायन पुलाचे पाडकाम, होणार ट्रॅफिक जाम...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 9:39 AM

माहीम, बीकेसीकडे जाणाऱ्यांचे हाल निश्चित.

मुंबई : माटुंगा व कुर्ला वाहतूक विभागातील पूर्व-पश्चिम जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वेकडून तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. त्यामुळे बी. ए. रोडवरून सायन ओव्हर ब्रिज पश्चिम वाहिनी मार्गे एल. बी. एस. रोड तसेच संत रोहिदास रोडकडे जाणारी वाहतूक, एल. बी. एस. रोड तसेच संत रोहिदास रोडवरून सायन ओव्हर ब्रिज पूर्व वाहिनीवरून बी. ए. रोड मार्गे जाणारी वाहतूक बंद करून इतर मार्गाने वळविण्यात येणार असल्याने मुंबईत येणाऱ्या जाणाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. 

मुळात सायन ओव्हर ब्रिज हा पूर्व आणि पश्चिमेला जोडला जात असून, आता तोडकामामुळे ब्रिज बंद होणार असल्याने मुंबईकरांची मोठी पायपीट होणार आहे. सायन ओव्हर ब्रिज तोडून नवीन बांधण्यात येणार असून, वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार, वाहतूक व्यवस्थापनाचे आदेश २० जानेवारी ते ३१ मेपर्यंत लागू राहतील.

डॉ. बी. ए. रोड दक्षिण वाहिनी सायन जंक्शनवरील वाहतूक ही सायन सर्कल, सायन हॉस्पिटल जंक्शन येथून उजवे वळण घेऊन, सुलोचना शेट्टी मार्गाने पुढे कुंभारवाडा जंक्शन येथून..

अ) कुर्ला व धारावीकडे - कुंभारवाडा जंक्शन येथून उजवे वळण घेऊन के. के. कृष्णन मेनन मार्ग (९० फूट) रोडने अशोक मिल नाका उजवे वळण घेऊन संत रोहिदास मार्गाने पुढे ही पैलवान नरेश मागे चौक येथून  वाहने इच्छित स्थळी जातील.

ब) पश्चिम द्रुतगती मार्ग व वांद्राकडे - कुंभारवाडा जंक्शन येथून सरळ संत कबीर मार्ग (६० फूट) रोडने केमकर चौक येथून उजवे वळण घेऊन सायन माहीम लिंक रोडने टी. जंक्शन येथून डावे वळण घेऊन कलानगर जंक्शन मार्गे इच्छितस्थळी जातील.

डॉ.बी.ए. रोड उत्तर वाहिनीवरून येणारी वाहतुक ही सायन हॉस्पिटल जंक्शन येथून डावे वळण घेवून सुलोचना शेट्टी मार्गाने पुढे कुंभारवाडा जंक्शन मार्गे इछित स्थळी जातील.

कुंभारवाडा जंक्शन येथून उजवे वळण घेवून के. के. कृष्णन मेनन मार्ग रोडने अशोक मिल नाका उजवे वळण घेवून नरेश माने चौक येथून डावे वळण घेवून इच्छित स्थळी जातील. कुंभारवाडा जंक्शन येथून संत कबीर मार्ग रोडने केमकर चौक येथून सायन माहीम लिंक रोडने टी. जंक्शन येथून कलानगर जंक्शन मार्गे जातील.

नो पार्किग करण्यात आलेले मार्ग :

  संत कबीर मार्ग (६० फुट) रोड : धारावी ओव्हर ब्रिज (सायन हॉस्पीटल ब्रिज) ते केमकर चौकपर्यंत 

  सायन माहिम लिंक रोड : टी जंक्शन ते माहिम फाटकपर्यंत 

  माटुंगा लेबर कॅम्प : टी.एच. कटारिया मार्ग हा कुंभारवाडा जंक्शन ते शोभा हॉटेल पर्यंत

  सुलोचना शेटट्टी मार्ग : सायन हॉस्पीटल जंक्शन ते सायन हॉस्पीटल गेट नंबर ७ पर्यंत

  भाऊ दाजी रोड : सायन हॉस्पीटल गेट नंबर ७ ते रेल्वे ब्रिज

  संत रोहिदास मार्ग : पैलवान नरेश माने चौक ते वाय जंक्शन

  सायन वांद्रे लिंक रोड - वाय जंक्शन ते टी जंक्शन

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वे