मुंबई : गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी मूर्तींचे आगमन व विसर्जन मार्गावर असलेल्या रस्त्यांवरचे खड्डे त्वरित बुजवावेत, तसेच रस्त्याशेजारील बेकायदा पार्किंग हटवावे, अशा विविध मागण्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय समितीच्या बैठकीत केल्या. चांदिवली परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याने व या मार्गावरील रस्त्यांच्या दुतर्फा बेकायदा पार्किंगचे प्रमाण जास्त असल्याने गणेशोत्सवात मोठी समस्या निर्माण होण्याची भीती आहे, त्यामुळे या समस्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी मंडळांतर्फे करण्यात आली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व नवरात्रौत्सव मंडळांना भेडसावणाºया समस्यांचे निराकरण करण्यासाठी, खान यांच्या पुढाकाराने व अध्यक्षतेखाली असल्फा येथील जंगलेश्वर महादेव मंदिर सभागृहात समन्वय समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये चांदिवली परिसरातील सुमारे २०० मंडळांच्या पदाधिकाºयांसह प्रशासनातील अधिकारी सहभागी झाले होते. या वेळी गणेशोत्सव मंडळांनी बेकायदा पार्किंग, खड्डे दूर करावेत, वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, आॅनलाइन परवानगी प्रक्रियेसोबत आॅफलाइन प्रक्रियाही सुरू ठेवावी आदी मागण्या केल्या. त्या त्वरित पूर्ण कराव्यात व गणेशोत्सव, नवरात्रौत्सवामध्ये कोणतीही समस्या निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना माजी मंत्री तथा काँग्रेसचे आमदार आरिफ नसीम खान यांनी अधिकाºयांना केली, महापालिकेच्या अधिकाºयांनी या मागण्यांची दखल घेऊन कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
या बैठकीला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबांवकर, गिरीश वालावलकर, परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी, महापालिकेचे उपायुक्त, साकीनाका व घाटकोपर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभागाचे अधिकारी, रस्ते विभागाचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी, वीज विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
एल वॉर्डमधील रस्त्यांवरील खड्डे दोन दिवसांत बुजविण्यासाठी काम सुरू करण्याचे आश्वासन महापालिकेच्या अधिकाºयांनी दिले. २८ आॅगस्ट ही आॅनलाइन परवानगी मिळण्याची शेवटची मुदत असल्याने, आवश्यकता भासल्यास ही मुदत वाढविण्याची ग्वाही महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र बर्डे यांनी दिल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबांवकर यांनी दिली.खड्ड्यांपासून वाचण्यासाठी मंडळाचा अनोखा उपायरस्त्यातील खड्ड्यांमुळे बाप्पाच्या मूर्ती मंडळामध्ये पोचण्यास विलंब होत आहे. ज्या प्रवासाला एक तास लागतो, तेथे दोन ते अडीच तास लागत आहेत. महापालिकेकडून खड्डे बुजवेपर्यंत विलंब होत असल्याने, मूर्ती सुरक्षित आणण्यासाठी मंडळांनी नवा उपाय शोधला आहे. बहुतांश मंडळे गणेश मूर्ती ट्रॉलीद्वारे नेतात. खड्ड्यांमधून जाताना कापडाची गोणी गुंडाळून खड्ड्यामध्ये ठेवून त्यावर स्टीलची, लोखंडी प्लेट ठेवून ट्रॉलीची चाके त्यावरून नेण्यात येतात. सर्व मंडळांनी या उपायाचा अवलंब करावा, असे आवाहन दहिबांवकर यांनी केले आहे.बाप्पाच्या मार्गातील या रस्त्यांवर खड्डेच खड्डेचांदिवली, साकीनाका परिसरातील जवळपास सर्व रस्त्यांमध्ये खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे.कुर्ला अंधेरी मार्ग, सफेद पूल, साकीनाका मेट्रो स्टेशन, खैरानी रोड, असल्फा घाटकोपर इत्यादीयेथे बेकायदा पार्किंगकुर्ला ते अंधेरी मार्ग, घाटकोपर खेरानी मार्ग, मेट्रोच्या खालील मार्ग, कुर्ला येथील लालबहादूर शास्त्री मार्ग, जरीमरी, सफेद पूल