ई-कचरा हाताळण्याचे प्रात्यक्षिक; मुंबई, ठाण्यासह जवळपासच्या भागात १०० इको-बिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:05 AM2021-03-31T04:05:47+5:302021-03-31T04:05:47+5:30

सचिन लुंगसे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ई-कचऱ्याची म्हणजेच वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटची विल्हेवाट कशी लावायची याचे दाखले ...

Demonstration of e-waste handling; 100 eco-bins in Mumbai, Thane and nearby areas | ई-कचरा हाताळण्याचे प्रात्यक्षिक; मुंबई, ठाण्यासह जवळपासच्या भागात १०० इको-बिन

ई-कचरा हाताळण्याचे प्रात्यक्षिक; मुंबई, ठाण्यासह जवळपासच्या भागात १०० इको-बिन

Next

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ई-कचऱ्याची म्हणजेच वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटची विल्हेवाट कशी लावायची याचे दाखले दिले जात असतानाच आता एक मोहीम सुरू करण्यात आली असून, देशाच्या आर्थिक राजधानीत आणि आजूबाजूच्या परिसरात ही मोहीम मूळ धरत आहे. या ई - कचऱ्यात मोबाईल, चार्जर, लॅपटॉप, कीबोर्ड, माऊस, टीव्ही, डेस्कटॉप, मिक्सर, ओव्हन, इस्त्री, फ्रीज, वॉशिंग मशीनचा समावेश आहे. ६९२ भागांतून ११८ फेऱ्या करून ई कचरा गोळा करण्यात आला. मुंबई, ठाण्यासह जवळपासच्या भागात १०० इको-बिन उपलब्ध करुन देण्यात आले.

ई - कचरा निर्मितीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर असून, देशात वर्षाला ३.२ दशलक्ष मेट्रिक टन ई कचरा निर्माण होतो. त्यापैकी सुमारे ३० टक्के पश्चिम भारतात निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर लोकांच्या घरून ई - कचरा शास्त्रोक्त पद्धतीने गोळा करण्यावर भर देण्यात येत आहे. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबरोबरच इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक सामग्री निर्माण करणाऱ्या निर्मात्यांना ई - कचरा व्यवस्थापन नियम पाळण्याच्या दृष्टीनेही या मोहिमेद्वारे व्यासपीठ प्राप्त करुन देण्यात आले आहे. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना ही उपकरणे टाकून द्यायची असतील तर त्यांचा हा ई - कचरा गोळा करण्यासाठी आणि त्याचे रिसायकलिंग करण्यासाठी या मोहिमेद्वारे काम केले जात आहे.

* माती, हवा, जल, पयार्याने मानवी आरोग्यावर विपरित परिणाम

२०२५ पर्यंत देशाचा ई - कचऱ्याचा आकडा ८ दशलक्ष मेट्रिक टनवर जाण्याचा अंदाज आहे. देशातील युवा तसेच कमावत्या लोकसंख्येकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मोठी मागणी आहे. परंतु त्याचवेळी या ई - कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावली जात असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे. पर्यावरण व्यवस्थेचा ऱ्हास येणाऱ्या अनेक पिढ्यांना भोगावा लागेल. इलेक्ट्रॉनिक वस्तू अयोग्य पद्धतीने फेकून दिल्यास त्यातून विषारी रसायने बाहेर पडतात. त्याचा विपरीत परिणाम पृथ्वीवरील माती, हवा, जल आणि पयार्याने मानवी आरोग्यावर होतो.

- बी. के. सोनी, तज्ज्ञ, ई - कचरा रिसायकलिंग क्षेत्र

* का वाढतो ई कचरा?

वाढते डिजिटलायझेशन, ऑनलाईन पेमेंट, स्मार्ट सिटी प्रकल्प, तंत्रज्ञानात होणारे बदल.

* मुंबईत वर्षाला जमा हाेताे तीन ते चार लाख टन ई - कचरा

मुंबईत वर्षाला तीन ते चार लाख टन एवढा ई - कचरा जमा होतो, तर दिवसाला एक हजार टन ई - कचरा जमा होतो.

संपूर्ण महाराष्ट्रात रोज अडीच हजार टन ई - कचरा जमा होत असून, वर्षाला हा आकडा ८ लाख टन आहे.

..............................................

Web Title: Demonstration of e-waste handling; 100 eco-bins in Mumbai, Thane and nearby areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.