लसीकरणाची प्रात्यक्षिक प्रक्रिया नियोजनबद्ध नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:06 AM2021-03-15T04:06:37+5:302021-03-15T04:06:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना लसीकरणासाठी कोविन अॅप किंवा आरोग्य सेतू अॅपमार्फत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सोपी आणि स्पष्ट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना लसीकरणासाठी कोविन अॅप किंवा आरोग्य सेतू अॅपमार्फत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सोपी आणि स्पष्ट असताना त्यापुढची जी प्रात्यक्षिक प्रक्रिया आहे ती मात्र नियोजनबद्ध नाही. केवळ नोंदणी करून काम होत नाही, कारण ग्राउंडवरील प्रत्यक्ष काम करणारी यंत्रणा महत्त्वाची आहे. जी फर्स्ट कम फर्स्ट तत्त्वावर काम करते. त्यामुळे उगाच गर्दी होते, ज्याचा परिणाम लोकांची लसीकरण प्रक्रिया पुढे ढकलण्यात होतो, अशी टीका आम आदमी पक्षाने केली आहे.
२४/७ तास लसीकरण आणि झोपडपट्ट्या ते लसीकरण केंद्रापर्यंत वाहनांच्या सोयीसुविधा केवळ कागदावरच आहेत. वृद्ध नागरिक आणि अत्यावश्यक सेवेतील रुग्ण यांना सुरुवातीला प्राधान्यक्रम होते. मात्र लसीकरणाच्या प्रक्रियेच्या मंद गतीमुळे लसीकरणाचा पुढचा टप्पा; ज्यामध्ये मुंबईची वर्किंग क्लास लोकसंख्या आहे तिचे लसीकरण करण्यात अडथळा निर्माण होत आहे.