प्रसार भारतीच्या धोरणांविरोधात निदर्शने; अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 05:01 AM2018-08-02T05:01:47+5:302018-08-02T05:01:58+5:30

‘आकाशवाणीचा गळा घोटू नका, दूरदर्शनचे डोळे मिटू नका’ असे फलक दाखवत, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या मुख्यद्वारासमोर आकाशवाणी कार्यक्रमाधिकारी आणि सहायक संचालकांनी ‘प्रसार भारती’च्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध निदर्शने केली.

 Demonstrations against Prasar Bharti policies; Promotion of inefficient employees | प्रसार भारतीच्या धोरणांविरोधात निदर्शने; अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना पदोन्नती

प्रसार भारतीच्या धोरणांविरोधात निदर्शने; अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना पदोन्नती

Next

मुंबई : ‘आकाशवाणीचा गळा घोटू नका, दूरदर्शनचे डोळे मिटू नका’ असे फलक दाखवत, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या मुख्यद्वारासमोर आकाशवाणी कार्यक्रमाधिकारी आणि सहायक संचालकांनी ‘प्रसार भारती’च्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध निदर्शने केली. बढती, पदोन्नती नियमांत आकाशवाणी महासंचालनालयाने फेरबदल करून, गेल्या २५ वर्षांपासून या अधिकाºयांना डावलले आहे, तर अकार्यक्षम कर्मचाºयांना पदोन्नती दिली आहे, असे आरोप करीत ही निदर्शने करण्यात आली.
प्रसार भारती आणि माहिती व प्रसारण खात्याच्या संगनमताने कार्यक्रम कर्मचाºयांना गेल्या २५ वर्षांपासून बढतीपासून वंचित ठेवले आहे. ‘डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटी’च्या बैठका न झाल्यामुळे, या कर्मचाºयांना गेल्या २५ वर्षांपासून त्याच पदावर काम करावे लागत आहे. पदोन्नती यादीत आकाशवाणी महासंचालनालयाने फेरफार करून काही नियमबाह्य बढत्या केल्या. त्यामुळे काही कर्मचारी न्यायालयात गेले.
न्यायालयाने बढत्यांबाबत त्वरित निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊनही, प्रसार भारतीकडून याबाबत कार्यवाही न झाल्याने देशभर कार्यक्रम अधिकाºयांनी गेट मिटिंग्ज आणि निदर्शनाचे सत्र सुरू केले आहे. कर्मचाºयांची संख्या अत्यंत कमी झालेली असून, दिवसेंदिवस त्यांच्यावरील कामाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे असंतोषाचे वातावरण आहे.
दरम्यान, प्रसार भारतीने कामाचा शून्य अनुभव असलेल्या रेव्हिन्यू, फॉरेस्ट, सेल्स टॅक्स, टेलीकम्युनिकेशन आदी खात्यांमधील अधिकाºयांच्या नेमणुका वरिष्ठ पदांवर केल्या आहेत. आकाशवाणी व दूरदर्शच्या जॉइंट फोरमने याला विरोध दर्शवत, ३१ आॅगस्टपर्यंत नियमबाह्य नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे २७ जुलै रोजी लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.

...तर उपोषण करू
कार्यक्रम विभागात वरिष्ठ पदांच्या ज्या रिक्त जागा आहेत, त्या मूळच्या कर्मचाºयांना बढत्या देऊन ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत भराव्यात, अशीही मागणी ‘जॉइंट फोरम’ने केली आहे.
अभियांत्रिकी विभागातील कर्मचाºयांना बढत्या देऊन कार्यक्रम विभागाची वरिष्ठ सूत्रे त्यांच्याकडे सोपविण्यालाही ‘फोरम’चा सक्त विरोध आहे.
यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय झाला नाही, तर प्रसार भारतीवर देशभरातील कार्यक्रम अधिकारी मोर्चा काढतील, तसेच आकाशवाणी-दूरदर्शन जॉइंट फोरमचे पदाधिकारी आपल्या सहकाºयांसोबत उपोषणाला बसतील, असाही इशारा देण्यात आला आहे.

Web Title:  Demonstrations against Prasar Bharti policies; Promotion of inefficient employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई