‘भारतमाता’जवळ मिल मजदूर संघाची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 05:29 AM2020-01-09T05:29:20+5:302020-01-09T05:29:28+5:30
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र इंटक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली लालबागच्या भारतमाता सिनेमा येथे निदर्शने करत, केंद्र सरकारचा निषेध केला.
मुंबई : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र इंटक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली लालबागच्या भारतमाता सिनेमा येथे निदर्शने करत, केंद्र सरकारचा निषेध केला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मुंबईतील चालू असलेल्या सर्व गिरण्या बंद ठेवून गिरणी कामगार घोषणा देत आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनांनी पाठिंबा दिला. त्यामध्ये इंडस्ट्री आॅल ग्लोबल, इंटर नॅशनल ट्रेड युनियन कॉन्फिडरेशन आदी संघटनांचा समावेश होता.
>इंटकप्रणीत सेंट्रल रेल्वे मजदूर कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक कारखान्यांतील कामगार आंदोलनात सहभागी झाले. अडीच तास ही निदर्शने करण्यात आली.