डेंग्यूचाही प्रादुर्भाव वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 06:23 AM2019-04-17T06:23:27+5:302019-04-17T06:23:29+5:30

पूर्वी केवळ पावसाळ्यात दिसणारे साथीचे आजार आता तेवढ्या काळापुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

 Dengue is also increasing | डेंग्यूचाही प्रादुर्भाव वाढतोय

डेंग्यूचाही प्रादुर्भाव वाढतोय

Next

मुंबई : पूर्वी केवळ पावसाळ्यात दिसणारे साथीचे आजार आता तेवढ्या काळापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. एका बाजूला स्वाइन फ्लूची राज्यात दहशत कायम आहे, तर दुसऱ्या बाजूला डेंग्यूनेही डोके वर काढले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आॅक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या काळात डेंग्यूचे तब्बल ३.२५ लाख रुग्ण आढळले. म्हणजेच दर महिना सरासरी २७ हजार रुग्ण आढळतात.
वर्षातील बाराही महिने डेंग्यूचे रुग्ण आढळतात. पावसाळा आणि त्यानंतरच्या काही काळात डेंग्यूचे डास अधिक सक्रिय असतात. २०१८ या वर्षात राज्यात मलेरिया आणि डेंग्यूमुळे सर्वांत जास्त मृत्यू झाले आहेत. या एकाच वर्षात राज्यात डेंग्यूमुळे ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. ९ हजार ४५१ डेंग्यू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. इतर राज्यांशी तुलना करता हे प्रमाण खूप जास्त आहे. या आकडेवारीमध्ये मलेरियामुळे ६ मृत्यू झालेले पश्चिम बंगाल आणि डेंग्यूमुळे ३७ मृत्यू झालेले केरळ हे महाराष्ट्राच्या खालोखाल आहे. हे प्रमाण गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत जास्त आहे.
२०१७ मध्ये डेंग्यूच्या एकूण ७ हजार ८२९ रुग्णांची नोंद करण्यात आली होती आणि ६५ जणांचा मृत्यू झाला होता. भारतात २०१८ या वर्षी डेंग्यूमुळे तब्बल १४४ मृत्यू झाले आहेत.
ताज्या पाण्यातही होऊ शकते पैदास
डेंग्यू पसरविणाºया एडिस डासांची पैदास घरातील ताज्या पाण्यातही होऊ शकते. फुलदाण्या, कूलर, एसी ट्रे, फ्रीजचा ट्रे, न झाकलेल्या बादल्या आणि पाण्याची भांडी ही या डासांसाठी उत्तम जागा असते. घरात कुठेही पाणी उघडे ठेवू नका. सर्व ठिकाणचे अनावश्यक पाणी ओतून टाका. घराबाहेर पडताना नेहमी डासांच्या औषधांचा वापर करा, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Web Title:  Dengue is also increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.