मागील वर्षभरात मुंबईत डेंग्यूचे प्रमाण झाले कमी, महापालिकेच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:58 AM2021-02-01T02:58:39+5:302021-02-01T02:59:09+5:30

Mumbai Health News : मुंबईत कोरोनाच्या साथीदरम्यान मागील वर्षभरात डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०२० साली २०१९ च्या तुलनेत यावर्षी डेंग्यूने ग्रस्त लोकांची संख्या ८६ टक्के कमी झाली आहे. 

Dengue cases in Mumbai have come down in the last one year | मागील वर्षभरात मुंबईत डेंग्यूचे प्रमाण झाले कमी, महापालिकेच्या प्रयत्नांना यश

मागील वर्षभरात मुंबईत डेंग्यूचे प्रमाण झाले कमी, महापालिकेच्या प्रयत्नांना यश

Next

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या साथीदरम्यान मागील वर्षभरात डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०२० साली २०१९ च्या तुलनेत यावर्षी डेंग्यूने ग्रस्त लोकांची संख्या ८६ टक्के कमी झाली आहे. 

कोरोनामुळे इतर विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बराच काळ उपचारापासून वंचित राहावे लागले आहे. मात्र, डेंग्यू, मलेरिया या डासांचा नाश करणाऱ्या पालिकेच्या कीटकनाशक विभागाने स्वच्छतेच्या कामात सक्रिय सहभाग घेतला आहे. कोरोनासह साथीच्या आजारांवर उपचार करण्यासाठीही पालिकेच्या दवाखाने, आरोग्य केंद्रांसह रुग्णालयांमध्ये उपाययोजना कऱण्यात आल्या आहेत. 

मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने टोलेजंग इमारती, चाळी, गृहनिर्माण सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये शोधमोहीम राबवून डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत. यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या तब्बल एक लाख आठ हजार २६ छोट्या-मोठ्या वस्तू तसेच ५१४ टायर्स संबंधित ठिकाणांहून  हटविले. यामुळे संबंधित भागात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे.  

भायखळा (ई विभाग)परिसरातून डासांची उत्पत्तीस्थाने बनू पाहणाऱ्या सर्वाधिक म्हणजे १६ हजार ३५५ वस्तू हटविण्यात आल्या. त्याखालोखाल जी-दक्षिणमधून नऊ हजार ३५८, ए मधून आठ हजार ३२ वस्तू हटविण्यात आल्याचे पालिकेने सांगितले.

Web Title: Dengue cases in Mumbai have come down in the last one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.