गोरेगाव : सध्या मुंबईत डेंग्यूने थैमान घातले आहे. लोकसहभागातून पश्चिम उपनगरांत शिवसेनेच्या नगरसेविका आणि आरोग्य समिती सदस्या प्रमिला शिंदे यांनी डेंग्यूमुक्त जनजागृती अभियान सुरू केले आहे.
डेंग्यूबाबत जनजागृती आणि उपाययोजना करण्यासाठी गोरेगावसह पश्चिम उपनगरांत सर्व उच्च व माध्यमिक विद्याथ्र्यासाठी त्यांनी डेंग्यूमुक्त स्पर्धा आयोजित केली आहे. यासाठी सर्व विद्याथ्र्यानी आपल्या भागात फिरून डेंग्यूजन्य डासांच्या अळ्य़ा शोधून काढाव्यात, असे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे जे विद्यार्थी डेंग्यूच्या सर्वात जास्त अळ्य़ा दाखवतील त्यांना नगरसेविका प्रमिला शिंदे पारितोषिक देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
गोरेगाव व मालाड परिसरात छोटय़ा व मोठय़ा आजारांची संख्या कशी कमी होईल, यासाठी सर्व सोसायटय़ांमधील कुंडय़ांखालील साचलेले पाणी बदलण्यात यावे, झोपडपट्टी भागात झोपडय़ांवर टायर टाकले जाते आणि या टायरमधील पाण्यात डेंग्यूच्या प्रादुर्भाव आढळतो. याबाबत त्यांनी येथील गणोशोत्सव मंडळ, नवरात्री मंडळ, दहिकाला मंडळांना पत्रकाद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन केले आहे. त्यांना या डेंग्यूमुक्त अभियानात सहभागी करून घेतले आहे. या मंडळाच्या सर्व कार्यकत्र्यानी एक तास देऊन डेंग्यूमुक्त अभियानात नागरिकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
आतार्पयत प्रमिला शिंदे यांनी डेग्यू, मलेरियासंदर्भात स्वत: कसे वाचू आणि इतरांना कसे वाचवू, यासंदर्भात जनजागृती आणि उपाययोजना करण्यासाठी गोरेगाव व मालाड परिसरातील विविध आस्थापनांना या मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. या संदर्भात सर्व शाळा, महाविद्यालये, पोलीस ठाणो, हॉटेल्स, अग्निशमन दल, तहसीलदार व तलाठी कार्यालय, उघडय़ावर जेवण करणारे आणि विकणारे खाद्यपदार्थ विक्रेते, फेरीवाले, रात्रीच्या चायनीज गाडय़ा, बांधकाम व्यावसायिक, सोसायटय़ांचे पदाधिकारी या सर्वाना या डेंग्यूमुक्त मोहिमेत त्यांनी सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पालिकेतर्फे देखील उघडय़ा गटारांवर औषधांची फवारणी करण्यात येत आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी विभागातील डॉक्टरांशी किंवा परिसरातील महापालिका कार्यालयांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना डेंग्यूबाबत सर्व माहिती दिली जात आहे. (प्रतिनिधी)