डेंग्यू, लेप्टोमुळे दोघांचा मृत्यू
By admin | Published: October 4, 2016 03:06 AM2016-10-04T03:06:54+5:302016-10-04T03:06:54+5:30
सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस आणि मधेच पडणारे ऊन अशा बदलत्या वातावरणामुळे मुंबईत विविध तापांचे १३ हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबई : सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस आणि मधेच पडणारे ऊन अशा बदलत्या वातावरणामुळे मुंबईत विविध तापांचे १३ हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूमुळे एकाचा आणि लेप्टोने एकाचा मृत्यू झाला आहे.
घाटकोपर व्हिलेज येथील राजू चाळीत राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचा १ आॅक्टोबर रोजी डेंग्यूमुळे मृत्यू झाला. थंडी-ताप, डोकेदुखी, उलट्या असा या मुलाला पाच दिवस त्रास जाणवत होता. त्यानंतर त्याला केईएम रुग्णालयात १८ सप्टेंबरला दाखल करण्यात आले. त्याचा १ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यांत ४ हजार २४२ डेंग्यू अथवा डेंग्यूसदृश्य आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाने दिली.
कुर्ला येथे मुलीचा मृत्यू
कुर्ला नौपाडा येथील रघुनाथ चाळीत राहणाऱ्या २४ वर्षीय मुलीचा लेप्टोमुळे मृत्यू झाला आहे. या मुलीला ताप, डोकेदुखीचा त्रास जाणवत २० सप्टेंबरला तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २९ सप्टेंबरला दुपारी या मुलीचा मृत्यू झाला.
हाय रिस्क वॉर्ड
मलेरिया - ए, बी, के-पश्चिम, आर-उत्तर, एम-पूर्व, एम-पश्चिम
डेंग्यू - ई, एफ-दक्षिण, एफ-उत्तर, जी-दक्षिण, जी-उत्तर, एल, एम-पूर्व, एम-पश्चिम
लेप्टो - ई, एफ-उत्तर, एफ-दक्षिण, एच-पूर्व, एम-पूर्व
कायदेशीर कारवाई
जानेवारी ते आॅगस्ट दरम्यान १३ हजार ५९३ नोटीसा देण्यात आल्या आहेत
९२७ फौजदारी खटले दाखल.
२६ लाख ९२ हजार रुपयांचा दंड वसूल.
केलेल्या उपाययोजना
गोठ्यांची तपासणी : ३२६
दाखल केलेले गुन्हे : २२९
कुत्र्यांना केले लेप्टोचे लसीकरण : ५९९४
मलेरियासाठी केलेली कारवाई
५५ हजार ६२ आवारांची तपासणी
९ लाख ४९ हजार ६५१ कंटेनरची तपासणी
५ लाख २१ हजार ९८४ कंटेरनरमध्ये साचलेले पाणी काढले
डेंग्यूसाठी केलेली तपासणी
१ लाख २० हजार ६६० चाळी आणि परिसरांची तपासणी
८६ लाख ९२ हजार ९ घरगुती सामानाची तपासणी
९२ वाख १ हजार ९०० कंटेनरची तपासणी
१४ हजार ८२६ कंटेनर स्वच्छ केले
१९ लाख ६० हजार ९०० आवारांत, झोपड्यांमध्ये धूर फवारणी
७७ हजार ४०७ घरांमध्ये धूर फवारणी
१३ हजार ६२५ टायर आणि ४५ हजार ९१६ अडगळीच्या वस्तू हलवल्या .