Join us

डेंग्यूच्या डासांची ‘जेजे’ परिसरात पैदास

By admin | Published: October 01, 2014 2:56 AM

डासांची पैदास होऊ नये म्हणून महापालिका सर्व मुंबईभर जनजागृती करत असतानाच, जे.जे. रुग्णालयाच्या आवारात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मुंबई : डासांची पैदास होऊ नये म्हणून महापालिका सर्व मुंबईभर जनजागृती करत असतानाच, जे.जे. रुग्णालयाच्या आवारात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कर्मचारी वसाहतींमध्ये ही डासांची पैदास होत असल्यामुळे रुग्णालय प्रशासन या वसाहतींमध्ये जाऊन डेंग्यू, मलेरियाविषयी जनजागृती करीत आहे.  
पावसाळा सुरू झाल्यापासूनच महापालिका डेंग्यू आणि मलेरिया जनजागृती मोहीम राबवत आहे. घरांमध्ये, आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवा, पाणी साचू देऊ नका अशा आशयाची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. आता मुंबईत पावसाळा संपून ऑक्टोबर हीटची सुरुवात होत आहे. 
या वेळी जे. जे. आवारात गेट क्रमांक 2च्या जवळ असणा:या शांती इमारतीच्या तळमजल्याला डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे सोमवारी पालिकेच्या अधिका:यांना आढळून आले आहे. या ठिकाणी तृतीय श्रेणी कर्मचारी राहतात. तर 6 ते 7 दिवसांपूर्वी गेट क्रमांक 14च्या जवळ असणा:या तीन चाळींमध्येही डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे महापालिकेला आढळून आले आहे. या चाळीमध्ये चतुर्थश्रेणी  कर्मचारी राहतात. या चाळींमध्ये राहणा:या रहिवाशांना ताप येण्याचे प्रमाण 
वाढले आहे. मात्र सर्वाची प्रकृती स्थिर आहे. 
जे.जे. रुग्णालयाच्या आवारात राहणा:या काही निवासी डॉक्टरांनाही डेंग्यूची लागण झाली होती. आता मात्र सर्व डॉक्टरांची प्रकृती स्थिर असून, काही निवासी डॉक्टर पूर्णपणो बरे झाले आहेत. मात्र जे.जे. रुग्णालयातच दोन ते तीन ठिकाणी डासांची पैदास होत असल्याचे लक्षात आल्यावर रुग्णालय प्रशासनाने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. 
जे.जे.मधील डॉ. अतुल यांनाच डेंग्यूची लागण झाली आहे. इतर रुग्ण बाहेरचे आहेत. जे.जे.मधील लोकांना डेंग्यू झालेला नाही, असे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
कर्मचारी वसाहतीमध्ये राहणा:या कर्मचा:यांच्या घरी जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे. याच वसाहतीमध्ये राहणारी एखादी व्यक्ती रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यास, तीन दिवसांहून अधिक काळ ताप असल्यास डेंग्यू, मलेरियाची तपासणी करून घ्यायचा सल्ला दिला जात आहे.