रविवार असल्याने महिलेच्या प्रसूतीस नकार

By admin | Published: March 19, 2015 12:36 AM2015-03-19T00:36:03+5:302015-03-19T00:36:03+5:30

प्रभादेवीतील पालिकेच्या प्रसूतिगृहात आलेल्या एका गर्भवती महिलेची चक्क रविवार असल्याचे कारण देत बोळवण करण्यात आली़

Denial of delivery of woman to Sundays | रविवार असल्याने महिलेच्या प्रसूतीस नकार

रविवार असल्याने महिलेच्या प्रसूतीस नकार

Next

मुंबई : प्रभादेवीतील पालिकेच्या प्रसूतिगृहात आलेल्या एका गर्भवती महिलेची चक्क रविवार असल्याचे कारण देत बोळवण करण्यात आली़ शस्त्रक्रियेची आवश्यकता असतानाही परळ येथील केईएम रुग्णालयात या महिलेची नैसर्गिक प्रसूती करण्यात आली़ ज्यात या महिलेचे बाळ दगावले़ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप होत असल्याने पालिका प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी लावली आहे़
कांचन चव्हाण या महिलेला प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्याने तिने १५ मार्च रोजी प्रभादेवी येथील प्रसूतिगृह गाठले़ मात्र सीजर करावे लागणार असून रविवारी या प्रसूतिगृहात शस्त्रक्रिया होत नाही, असे सांगून तिची रवानगी परळ येथील केईएम रुग्णालयात करण्यात आली़
तेथेही तिला जबरदस्तीने नैसर्गिक प्रसूतीसाठी भाग पाडण्यात आले़ डॉक्टरांच्या या हलगर्जीपणामुळे तिचे बाळ दगावले, अशी तक्रार सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी
स्थायी समितीच्या बैठकीत आज
केली़
या प्रकरणाची माहिती आपल्यापर्यंत आली असून ही गंभीर बाब असल्याचे मत प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय संचालक डॉ़ सुहासिनी नागदा यांनी व्यक्त केले़ (प्रतिनिधी)

रविवारी शस्त्रक्रिया होत नाही, असे कारण डॉक्टर देऊच शकत नाही़ त्यामुळे या प्रकरणाची यापूर्वीच चौकशी लावण्यात आली आहे़ त्यानुसार दोषी आढळलेल्या डॉक्टरवर सक्त कारवाई करण्यात येईल.
- संजय देशमुख
अतिरिक्त महापालिका आयुक्त

Web Title: Denial of delivery of woman to Sundays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.