दाट धुक्याचा विमानसेवेवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 03:24 AM2019-12-23T03:24:10+5:302019-12-23T03:24:46+5:30

पुणे : दिल्लीसह देशातील विविध शहरांमध्ये पडत असलेल्या दाट धुक्यामुळे विमानसेवेवर परिणाम होत आहे. याचा फटका पुणे विमानतळावरून ये-जा ...

Dense fog impacts airlines | दाट धुक्याचा विमानसेवेवर परिणाम

दाट धुक्याचा विमानसेवेवर परिणाम

Next

पुणे : दिल्लीसह देशातील विविध शहरांमध्ये पडत असलेल्या दाट धुक्यामुळे विमानसेवेवर परिणाम होत आहे. याचा फटका पुणेविमानतळावरून ये-जा करणाऱ्या विमानांनाही बसत असून मागील दोन-तीन दिवसांपासून काही विमान उड्डाणांना विलंब होत आहे. दृष्यमानता कमी असल्याने विमान उड्डाणे व उतरण्याला अडचणी निर्माण होत आहेत.

प्रामुख्याने दिल्ली विमानतळावरून ये-जा करणाºया विमानांना धुक्याचा फटका बसत आहे. शनिवारी पुण्यातून पहाटे चार वाजता उड्डाण करणारे हैद्राबाद विमान रद्द करण्यात आले होते. दिल्लीतून मध्यरात्री १.३५ वाजता पुण्याकडे निघणारे विमानही रद्द करावे लागले. यांसह दिल्ली, अहमदाबाद, नागपूरकडे जाणाºया पाच विमानांना १ ते ३ तासांचा विलंब झाला. दिल्लीकडे जाणारे एक विमान अहमदाबादकडे वळवावे लागले. पहाटे ३ ते ६ या कालावधीत अधिक परिणाम झाल्याचे दिसले.

धुक्याचा रविवारीही विमानसेवेवर परिणाम झाला. सकाळी ६.२५ चे बंगळुरूकडे उड्डाण करणारे तर पहाटे १.२० वाजता दिल्लीकडे जाणारे विमान रद्द करावे लागले. नागपूरकडे सकाळी ७.२५ वाजता उड्डाण करणारे विमान तब्बल सात तासांनी रवाना झाले. सकाळी दिल्लीकडे जाणाºया तीन विमानांना एक ते दोन तासांचा विलंब झाला. त्याचप्रमाणे नाशिक, जोधपूर, नागपूर, चेन्नई, बंगळुरूकडे जाणाºया विमानांनी सुमारे १ ते दीड तास उशिरा उड्डाण केले. कोलकाता, दिल्ली व जयपूरकडून पुण्याकडे येणारे प्रत्येकी एक विमान रद्द करण्यात आले. तर बंगळुरू, दिल्ली, नाशिक, नागपूर येथून येणाºया काही विमानांना विलंब झाला.

तांत्रिक बिघाडामुळे मुंबई चंदिगड विमान माघारी
मुंबई : गो एअरच्या मुंबई हून चंदिगडला जाणाºया विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान अर्ध्या मार्गातून परत मुंबईकडे वळवण्यात आले. गो एअरच्या फ्लाईट क्रमांक जी ८२५०६ ने मुंबई विमानतळावरुन यशस्वीपणे उड्डाण केले. मात्र अध्यार्हून अधिक अंतर पार केल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड उद्भवल्याने विमान परत मुंबई विमानतळाकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई विमानतळावर हे विमान सुखरुपपणे उतरवण्यात यश आले. विमान उतरवल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढण्यात आले व विमानाची गो एअरच्या अभियंत्यांकडून तपासणी करण्यात आली व बिघाड दुरुस्त करण्यात आला. या प्रकारामुळे मुंबई विमानतळावर खोळंबलेल्या प्रवाशांना दुसºया विमानांद्वारे प्रवास करण्याची सुविधा पुरवण्यात आली.
 

Web Title: Dense fog impacts airlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.