दातांचे हॉस्पिटल ९० वर्षांचे झाले; तबेल्यात सुरू झालेल्या नायरचा थक्क करणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 09:17 AM2023-12-19T09:17:06+5:302023-12-19T09:17:18+5:30

नायर डेंटल कॉलेजला सोमवारी ९० वर्षे पूर्ण झाली. १९३३ साली क्लीनिकचे रूपांतर सहा डेंटल चेअर मध्ये करून मेडिकल कॉलेज सुरु करण्यात आले होते.

Dental Hospital Turns 90; Nair's astonishing journey that started in the stables | दातांचे हॉस्पिटल ९० वर्षांचे झाले; तबेल्यात सुरू झालेल्या नायरचा थक्क करणारा प्रवास

दातांचे हॉस्पिटल ९० वर्षांचे झाले; तबेल्यात सुरू झालेल्या नायरचा थक्क करणारा प्रवास

- संतोष आंधळे
लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : दातांवरील रामबाण आणि हमखास उपचार म्हणजे नायर डेंटल कॉलेज, असे सूत्र गेल्या कित्येक वर्षांपासून तयार झाले आहे. त्यामुळेच दातांच्या दुखण्यावर वाजवी दरांत या कॉलेजात दंतोपचार केले जातात. १९२७ साली तबेल्याच्या जागेत एका डेंटल चेअरवर सुरू झालेल्या डेंटल क्लिनिकचे आज ३०८ चेअरचे प्रशस्त नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज झाले आहे.

नायर डेंटल कॉलेजला सोमवारी ९० वर्षे पूर्ण झाली. १९३३ साली क्लीनिकचे रूपांतर सहा डेंटल चेअर मध्ये करून मेडिकल कॉलेज सुरु करण्यात आले होते. सध्याचे नायर डेंटल कॉलेज ज्या जागेवर आहे, ती अर्धा एकर जागा डॉ. एम. वेंकटराव यांनी देणगी स्वरूपात कॉलेजला दिली. त्यावेळी याठिकाणी पाच माळ्यांची डेंटल कॉलेजसाठीची इमारत तयार करण्यात आली त्यावेळी ७६ डेंटल चेअर होत्या. काळाच्या ओघात आठ आणि पाच माळ्याच्या दोन इमारती या ठिकाणी उभारल्या गेल्या. यंदा ११ माळ्याची इमारत जुन्या इमारतीच्या ठिकाणी बांधण्यात आली. 

सुरुवातीच्या काळात डॉ. व्ही.एम. देसाई नायर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता होते. त्यावेळी लायसेन्सशियट  (एलडीएस) हा दोन वर्षांचा कोर्स होता. त्यानंतर १९५१ मध्ये पदवी (बीडीएस) कोर्स, तर १९५४ मध्ये पदव्युत्तर एमडीएस कोर्स सुरू करण्यात आला.

सध्या डेंटल कॉलेजमध्ये काय आहे ? 
  दंत उपचारातील स्पेशालिटीचे नऊ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे कोर्सेस - २४ डॉक्टर प्रत्येक वर्षी  
 पदवी अभ्यासक्रमाचे ७५ विद्यार्थी या ठिकाणी दरवर्षी प्रवेश घेत असतात.   दोन विषयांत पीएचडी कोर्सेस - सहा विद्यार्थी प्रवेश घेतात  
 ४ ऑपरेशन थिएटर   नऊ स्पेशालिटीचे ओपीडी वॉर्ड   एक आयसीयू   २६५ मुलांसाठी हॉस्टेल रुग्णालय परिसरात   १०० मुले बसतील इतके २ भव्य क्लासरूम   कॅड कॅम अत्याधुनिक लॅबोरेटरी.

नायर डेंटल कॉलेजात दरवर्षी तीन लाख रुग्ण उपचार घेतात, तर १००० पेक्षा अधिक मोठ्या शस्त्रक्रिया या रुग्णालयात होत असतात.  १९७९ ला ज्या कॉलेजमध्ये मी बीडीएसला प्रवेश घेतला. तेच कॉलेज आता ९० वर्षाचे झाले असताना सध्या मी अधिष्ठता, संचालकपदी आहे, याचा मला आनंद आहे.
- डॉ. नीलम अंड्राडे, अधिष्ठाता, नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज, 

Web Title: Dental Hospital Turns 90; Nair's astonishing journey that started in the stables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.