मंडई सोडून जाण्यास कोळी बांधवांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:31 AM2019-07-15T01:31:03+5:302019-07-15T01:31:09+5:30

क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई कायमस्वरूपी बंद करून मासळी बाजार ऐरोली नाका येथे स्थलांतरित करण्यात येऊ नये,

Denying the Koli brothers to leave the yard | मंडई सोडून जाण्यास कोळी बांधवांचा नकार

मंडई सोडून जाण्यास कोळी बांधवांचा नकार

Next

मुंबई : क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई कायमस्वरूपी बंद करून मासळी बाजार ऐरोली नाका येथे स्थलांतरित करण्यात येऊ नये, म्हणून कोळी बांधव आंदोलन करणार आहेत. महापालिकेने ३१ जुलैपर्यंतची गाळे रिकामी करण्याची नोटीस दिली आहे़ छत्रपती शिवाजी महाराज मंडईवर ६०० महिला गाळेधारक आणि ४०० होलसेल विक्रेत्यांचा उदरनिर्वाह अबलंबून आहे. नोटीस कालावधी संपेपर्यंत संयुक्त बैठक घेऊन योग्य तो निर्णल लावावा, अन्यथा १ आॅगस्टपासून सर्व बाधित कोळी बांधव व महिला आंदोलन करतील, अशा इशारा देण्यात आला आहे.
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीतर्फे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, १ जुलै रोजी महापालिकेच्या बाजार समितीतर्फे मंडई बंद करण्याटी नोटीस देण्यात आली. सर्व किरकोळ मासळी विक्रेत्या महिलांनी नोटिसीचा निषेध करत, मंडई सोडून कोणत्याही अन्य ठिकाणी जाण्यास विरोध दर्शविला आहे.
नोटीसमधील विषयात ‘तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करणेबाबत’ असे नमूद करून मूळ नोटीसमध्ये ‘कायमस्वरूपी जागा मिळण्यास स्थलांतरित’ असा शब्दप्रयोग केला आहे, असे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी सांगितले.
> महापालिका गेल्या चार ते पाच वर्षांपासून मच्छीमार बांधवांची फसवणूक करत आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मंडई ही कोळी बांधवांचे शेवटचे अस्तित्व आहे. महापालिकेने मंडई धोकादायक ठरवून नोटीस पाठविली. मंडईवरील सर्व मजले उतरविण्यात आले आहेत. मंडईची दुरुस्ती ४० लाख रुपयांत होऊ शकते, असे महापालिकेच्या एका अभियंत्याने सांगितले. - संतोष पवार, सरचिटणीस, उरण सामाजिक संस्था.

Web Title: Denying the Koli brothers to leave the yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.