Join us

देवनार डम्पिंग ग्राउंडला अखेर टाळे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 1:59 AM

‘निरी’चा सल्ला घेणार : महापालिकेकडून बंद करण्याची प्रक्रिया सुरू

मुंबई : मुलुंडपाठोपाठ आता देवनार डम्पिंग ग्राउंडही बंद करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. शास्त्रोक्त पद्धतीनेहे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेचा (निरी) सल्ला घेण्यात येणार आहे. त्यामुळेनाक मुठीत घेऊन जगणाऱ्या देवनारवासीयांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

देवनार येथील १२० हेक्टरवर पसरलेले हे सर्वात मोठे डम्पिंग ग्राउंड आहे. येथे दररोज १२०० मेट्रिक टन कचरा विल्हेवाटीसाठी आणला जातो. तसेच १३०० मेट्रिक टन डेब्रिजही टाकले जाते. डम्पिंग ग्राउंडचे काम तीन पाळ्यांमध्ये संपूर्ण वर्षभर सुरू असते. मात्र, या ठिकाणी दररोज येणाºया कचºयामुळे देवनार परिसर, बीएआरसी, गोवंडी, शिवाजीनगर, बैंगनवाडी, चेंबूर, घाटकोपर परिसराला दुर्गंधीचा सामना करावा लागतो.कचºयामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड तत्काळ बंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक करीत आहेत.याबाबत उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणीदरम्यान देवनार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने नेमलेल्या निरीक्षण समितीच्या शिफारशीनुसार ‘निरी’च्या माध्यमातून देवनार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे.प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर!राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (मे. निरी) या सरकारी संस्थेला नागरी घनकचरा व्यवस्थापन अहवाल तयार करण्यासाठी नेमण्यात आले आहे. निरीने मुंबईत नागरी घनकचरा नमुना परीक्षण अहवाल करण्याचे काम २०१५ मध्ये उत्तमरीत्या केल्याचा पालिकेचा दावा आहे. इतर कुठल्याही संस्थेकडून सल्लागार म्हणून काम करण्याची निविदा मागवण्यात आली नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. या कामासाठी पालिकेकडून एक कोटी ८४ लाख आठ हजार रुपये खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.च्तांत्रिक सल्ला, कामासाठी निविदा तयार करणे, निविदांची पडताळणी करणे अशी कामे निरीकडून केली जाणार आहेत. 

टॅग्स :मुंबईकचरा