उत्तनसाठी मत्स्य विभागाचे स्वतंत्र परवाना कार्यालय; मच्छीमारांच्या मेळाव्यात अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 05:13 AM2018-07-30T05:13:24+5:302018-07-30T05:14:15+5:30

भार्इंदरच्या उत्तन, पाली, चौक परिसरांतील मच्छीमारांसाठी मत्स्य विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे आणि मत्स्य विभागाचे आयुक्त अरु ण विंधले यांनी शनिवारी पाली येथे झालेल्या मच्छीमारांच्या मेळाव्यात दिली.

 Department of Independent Fisheries Department; Guidelines for the fishermen's meeting | उत्तनसाठी मत्स्य विभागाचे स्वतंत्र परवाना कार्यालय; मच्छीमारांच्या मेळाव्यात अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

उत्तनसाठी मत्स्य विभागाचे स्वतंत्र परवाना कार्यालय; मच्छीमारांच्या मेळाव्यात अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

Next

मीरा रोड : भार्इंदरच्या उत्तन, पाली, चौक परिसरांतील मच्छीमारांसाठी मत्स्य विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे आणि मत्स्य विभागाचे आयुक्त अरु ण विंधले यांनी शनिवारी पाली येथे झालेल्या मच्छीमारांच्या मेळाव्यात दिली.
विचारे यांच्या प्रयत्नाने मत्स्य व्यवसाय विभाग व मेरीटाइम बोर्डाच्या सहकार्याने मेळावा झाला. सहआयुक्त राजेंद्र जाधव व विनोद नाईक, प्रादेशिक उपायुक्त अभय देशपांडे, उपायुक्त युवराज चौघुले, सहायक आयुक्त दिनेश पाटील व भूषण पाटील, परवाना अधिकारी राजेश पाटील, अतुल साठे, तटरक्षक दलाच्या यामिनी गोदुले व मुकेश कुमार, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आदींनी मच्छीमारांना मासेमारी, सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी, विविध योजना, कांदळवनाचे महत्त्व आदी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.
नवीन जेटी मंजूर झाली असून त्यासाठी ४२ कोटी रु पये खर्च होणार आहेत. त्याचे काम येत्या दिवाळीत सुरू होईल. पाली येथे मच्छीमारांसाठी डिझेलपंप मंजूर झाला
आहे.
मच्छीमारांसाठी समुद्रात असलेला जुना दीपस्तंभ बदलून नवीन दिवा मंजूर झाला आहे, असे विचारे यांनी सांगितले. ओली व सुकी मासळी खरेदी करणाºया काही व्यापाºयांनी मच्छीमारांचे कष्टाचे पैसे थकवले असून पोलिसांनी त्यासाठी विशेष पथक तयार करून व्यापाºयांवर कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी केली. मासेमारी बोटी वर घेण्यासाठी चौक व डोंगरी येथे दोन रॅम्प मंजूर झाले असून एकाचे काम पूर्ण झाले आहे. रोरोसेवा मंजूर झाली आहे. सरकारच्या नीलक्र ांती योजनेंतर्गत अनेक सोयीसुविधा असून त्याची माहिती मच्छीमारांना नियमित दिली जाणार आहे. उत्तनच्या मच्छीमारांना परवान्यांसाठी आता पालघरला खेपा माराव्या लागणार नाहीत. उत्तनसाठी स्वतंत्र कार्यालयाची मंजुरी झाली असून येथे पूर्णवेळ परवाना अधिकारी दिला जाणार असल्याचे विचारे यांनी सांगितले.
मेळाव्याला माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा, माजी महापौर कॅटलीन परेरा, मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, विरोधी पक्षनेते राजू भोईर, नगरसेविका हेलन गोविंद, शर्मिला बगाजी, अनिता पाटील, दीप्ती भट, नगरसेवक प्रवीण पाटील, एलायस बांड्या, जयंती पाटील, अनंत शिर्के, हरिश्चंद्र आमगावकर, मीरा-भार्इंदर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, माजी नगरसेविका शबनम शेख आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते मच्छीमारांना मासेमारीचे परवाने व बोटनोंदणी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच मच्छीमारांना समुद्रात कोणत्याही प्रकारचा धोका, अडचण निर्माण झाल्यास तातडीने त्याचा संदेश तटरक्षक दलास देता यावा, म्हणून सुरक्षायंत्रांचे वाटप, अर्ज भरण्याची प्रक्रि या केली जाणार आहे. सध्या १०० यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

उत्तनमध्ये ७५०
मच्छीमार बोटी
उत्तन परिसरात ७५० मच्छीमार बोटी असून मासेमारी परवाना आदींसाठी पालघर येथे एकच कार्यालय असल्याने मच्छीमारांना खूपच त्रास सहन करावा लागतो. पालघर आता वेगळा जिल्हा झाल्याने उत्तन येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Web Title:  Department of Independent Fisheries Department; Guidelines for the fishermen's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.