मुंबई- कल्याणमध्ये आज भाजपचा मेळावा सुरू आहे, या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. "खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत, त्यांनी भाजपच्या पाठित खंजीर खुपसला, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मनिषा कायंदेंची आमदारकी रद्द होणार?; जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणतात...
सुरुवातील देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते, शिवसेनेला ज्या दिवशी काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेनेच दुकान बंद करीन पण काँग्रेससोबत जाणार नाही. पण, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेला. तुम्ही निवडणुकीत भाजपसोबत मत मागितली, पण त्यांच्यासोबत गेलात. खरी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले. त्यांनी ज्यांच्यासोबत मत मागितली त्यांच्यासोबत येऊन सत्ता स्थापन केली आहे. ज्या विचारासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० लोकांना निवडून दिलं होतं त्यासाठी ती लोक आमच्यासोबत आली आहेत. आज विरोधकांची अवस्था अशी आहे की त्यांना सगळीकडे केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदीच दिसत आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'सगळ्या योजना आमच्या आहेत, तुम्ही केलेलं एक काम आम्हाला सांगा. आम्ही सुरू केलेली कामं महाविकास आघाडी सरकारने बंद केली. त्यांनी थांबवलेली कामे पुन्हा सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला ४ हजार कोटी रुपये दिली. आपल्या सगळ्यांना मोदींनी कोविडची लस दिली. ही लस दिली नसती तर आपल्या देशात परिस्थिती वाईट झाली असती. प्रधानमंत्री आवास योजनेतून २५ लाख घर दिली. मुद्रा योजनेतून अनेकांना मदत केली. आज देशाला मोदीजींच्या रुपाने मोठं नेतृत्व मिळालं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.