Join us

देवेंद्र फडणवीस यांच्या हाती स्टेअरिंग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत समृद्धी महामार्गाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 1:36 PM

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आहे.

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आहे. मात्र, त्यापूर्वी आज रविवार, ४ डिसेंबरला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर ते शिर्डी असा प्रवास सोबत करून समृद्धी महामार्गाची ट्रायल घेणार आहेत. या ट्रायलची सुरुवातही झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच कारमधून प्रवास सुरू केला आहे. विषेश म्हणजे या कारचे स्टेअरिंग देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीतून प्रवास करत आहेत. या कारचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. 

नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील सालईदाभा या टोल नाक्याजवळ उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी या स्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत  भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून रस्त्यांचे झालेले एकूण काम व कार्यक्रमाची तयारी याचा आढावा घेतला. रविवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सकाळी साडेआठ वाजता विमानाने नागपूरला आगमन झाले. तेथून सकाळी १०.१५ वाजता ते समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉइंटवर पोहोचले. येथून त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्गाने प्रवास सुरु केला आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेदेवेंद्रदादा देशमुखसमृद्धी महामार्ग